ट्रॅक्टरच्या धडकेत रांजणगाव मशिदच्या युवकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील हत्तलखिंडी ते वडझिरे जाणारे रोडवर पुलाजवळ हत्तलखिंडी शिवारात ट्रॅक्टरच्या धडकेने एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सदर इसम रांजणगाव मशिद येथील रहिवासी असून प्रशांत विजय गाढवे असे त्याचे नाव आहे. सदर घटना 16 मार्च रोजी 4.30 वाजता सदर घटना घडली होती.फिर्यादीनुसार गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधीची फिर्याद रमेश जयसिंग गाढवे (वय 38 वर्षे, धंदा शेती, राहणार रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जिल्हा अ. नगर) यांनी दिली असून पोपट दत्तू मुळे (राहणार निघोज, तालुका पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासबंधीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, 16 मार्च रोजी आरोपी पोपट मुळे हा त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हत्तलखिंडी ते वडझिरे रोडने पुलाजवळून घेऊन जात असताना तो अविचाराने हयगईने चालवुन मयत प्रशांत गाढवे यास

पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून त्यात जखमी करून त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला व औषध उपचाराकरता मदत न करता अपघाताची खबर न देता ट्रॅक्टरसह निघून गेला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24