महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- राज्यातील महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठक पार पडली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली.

यावेळी जिल्हा परिषदेत तिन्ही पक्षाच्या ताकदीवर महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याचे राजेंद्र फाळके यांनी सुतोवाच केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, काँग्रेसचे ज्ञानदेव वाफारे,

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसन लोटके, स्वानंद वाघ, संतोष वाघ यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी जिल्हा परिषद व विविध ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा करुन त्यासंदर्भाचे नियोजन करण्याचे ठरले.

यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आघाडीच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी लवकरच सयुंक्त बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24