file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायीनी ठरणारा मांडओहळ मध्यम प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग तिसऱ्या वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांसह तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाणी टंचाईच्या काळात दरवर्षी साधारण एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडओहळ धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते.

त्यामुळे मांडओहोळ धरणातून तालुक्यातील गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी टंचाईच्या काळात मांडओहोळ धरण तालुकावासियांसाठी जीवनदायीनी ठरते.

तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील काळू प्रकल्प १५ दिवसांपूर्वी पुर्ण क्षमतेने भरला आहे तर समाधान कारक पावसामुळे इतर मध्यम प्रकल्प ही भरण्याच्या मार्गावर आहेत.

दरम्यान मांडओहळ प्रकल्पची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. पळसपूर,

नांदुरपठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात आज अखेर ३९९ पैकी ३८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.