File Photo

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिन्यांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्याने राज्यातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत.

यातच नगर शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. नुकतेच मनपा शाळेतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणात मागे राहू नयेत यासाठी मनपाच्यावतीनेही डिजिटल शिक्षणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनपा शाळेतील शिक्षकांसाठी डिजिटल स्कूल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महानगरपालिका शाळेतील शिक्षकांसाठी मनपाच्यावतीने डिजिटल शाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिजिटल शाळेचे प्रणेते संदीप गुंड यांनी महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

दरम्यान या माध्यमातून मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्यावतीने तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन डिजिटल शाळांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.