अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- घरात विक्रीसाठी आणलेला 9 लाख 30 हजार रुपये किंमतीचा 46 किलो 425 गॅम गांजा संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर खुर्द शिवारात वर्पे वस्तीवर एका घरामध्ये गांजा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.

यामध्ये 9 लाख 30 हजार 660 रुपये किंमतीचा एकूण 46 किलो 425 ग्रॅम वजनाचा गांजा, 250 रुपये किमतींचा एक इलेक्ट्रानिक वजन काटा व 30 प्लॉस्टीक पिशव्या असा मुद्देमाल पोलिसांनी छापा टाकून जप्त केला.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिमा राजू पंचारिया (रा. कासारादुमाला, ता. संगमनेर), राजु चव्हाण (रा. संगमनेर) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.