Maruti Grand Vitara: मारुतीच्या नवीन SUV ग्रँड विटाराच्या किमतीबद्दल (Grand Vitara Prices) प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे या संदर्भात लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, त्याची किंमत 9.5 लाख ते 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. मात्र, कंपनीने सप्टेंबरअखेर किंमती जाहीर करायच्या ठरवाल्या आहेत.

हायब्रिड इंजिनसह येईल –

ग्रँड विटारा ही मध्यम आकाराची एसयूव्ही आहे आणि हायब्रीड इंजिनसह (hybrid engines) येणारी मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) पहिली कार असेल. यामुळे कारचे मायलेजही खूप चांगले आहे. मारुती सुझुकी कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, ही एसयूव्ही केवळ एक लिटर पेट्रोलमध्ये 28 किलोमीटर धावेल.

11,000 रुपयांमध्ये बुक करा –

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची प्री-बुकिंग (Pre-booking of Grand Vitara) 11 जुलैपासून सुरू झाली आहे. ही नवीन SUV फक्त 11,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. एकदा टाकी भरली की, ही SUV 1,200 किमी अंतर कापू शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. म्हणजे दिल्लीत टाकी भरली तर कुठेही न थांबता थेट बिहारला जाता येते.

उत्तम सनरूफ फीचर मिळेल-

ग्रँड विटारा ही मारुतीची सनरूफ वैशिष्ट्यासह येणारी दुसरी एसयूव्ही असेल. यापूर्वी कंपनीने नवीन ब्रेझामध्ये (New Brezza) सनरूफ दिले होते. पॅनोरामिक सनरूफ व्यतिरिक्त, ग्रँड विटारामध्ये 360-डिग्री कॅमेरा मिळेल. त्यामुळे चालकाला गाडी चालवणे सोपे जाते. कंपनीने नवीन बलेनो (New Baleno) आणि ब्रेझा सारखे हेड-अप डिस्प्ले देखील दिले आहेत.

आणखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत –

कंपनी या नवीन SUV Grand Vitara मध्ये हवेशीर सीट, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड यांसारखी वैशिष्ट्ये देखील देत आहे. मारुती सुझुकीचा दावा आहे की, ही SUV कोणत्याही हवामानात आणि भूप्रदेशात अगदी सहज चालवता येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्टमध्ये त्याचे उत्पादन सुरू होईल. तर विक्री पुढील महिन्यापासून म्हणजेच सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते.

6 रंग पर्यायांमध्ये येईल –

मारुतीची ही एसयूव्ही 6 रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रँड व्हिटाराला ईव्ही मोड मिळेल. यामध्ये कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरने चालविली जाते.

बॅटरी इलेक्ट्रिक मोटरला ऊर्जा देते, त्यानंतर मोटर चाकांना शक्ती देते. ही प्रक्रिया कोणत्याही आवाजाशिवाय सुरू राहते. ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड पॉवरट्रेन टोयोटाकडून घेतली आहे.