अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनसह कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत त्यावर केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

त्यांच्या निदर्शनानुसार नगर मनापाच्यावतीने आरोग्य विभाग सक्षम करण्यात आला असून, वाढत्या पेशंटची संख्या पाहता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यादृष्टीने तयार केलेली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे, त्याचबरोबर लसीकरण हे सर्वात महत्वाचे आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तीस कोरोनाचा धोका कमी प्रमाणात आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपले व आपल्या कुटूंबाचे लसीकरण करुन घेतले पाहिजे.

त्याचप्रमाणे आता शासनाच्या निर्देशानुसार बुस्टर डोसही देण्यास प्रारंभ झाला आहे. पात्र लाभार्थ्यांनी हा डोस घेऊन कोरोनापासून बचाव करावा. असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुर्स­या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. परंतु लसीकरण सुरु झाल्यापासून कोरोनाची संख्या कमी झाली होती, आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाच्या नियमांचे पालन करुन यावरही आपण मात करु शकतो.

त्यासाठी लसीकरण, बुस्टर डोस हे महत्वाचे असल्याने नागरिकांनी स्वत:हून मनपाच्या केंद्रावर हा डोस घेऊन आपली व इतरांचीही काळजी घ्यावी.