अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- घोटाळ्यानंतर रद्द झालेलया म्हाडाच्या भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे.

परीक्षेचे अंतिम वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 29, 30 आणि 31 जानेवारी तसेच 1 ते 3 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे.

 

                                                     

म्हाडा परीक्षेच्या दिनांक आणि वेळा बाबत अधिक जाणून घेण्यासाठी https://mhadarecruitment.in/ या वेब पेज ला भेट द्या.

म्हाडातील 144 पदांच्या 565 रिक्त जागा भरण्यासाठी 12 ते 20 डिसेंबरदरम्यान परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या एका संचालकाने प्रश्नपत्रिका फोडण्याचा डाव आखला होता. हि गंभीर बाब पुणे सायबर पोलिसांच्या लक्ष्यात आल्यावर सदरील घटनेचा पोलिसांनी फंडाफोड केला.पेपर फुटीचे हे गंभीर प्रकरण उघड पडल्यावर सरकारने तात्काळ परीक्षा रद्ध केली.

पोलिसांनी कारवाई दरम्यान जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि काही दलालांना अटक केली होती. आता होणारी परीक्षा टीसीएस च्या माध्यमातून घेतली जाईल असे सरकारने जाहीर केले. नवीन तारखा 29, 30 आणि 31 जानेवारी तसेच 1 ते 3 फेब्रुवारी अश्या आहेत.