अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टी प्रकरणामध्ये रोज नविन खुलासे होत आहेत. एनसीबीच्या कारवाईनंतर नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

कॉर्डेलिया क्रूझप्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा 100 टक्के सहभाग असून वेळ आल्यानंतर सर्वांची नावे जाहीर करणार असल्याचा इशारा भाजपाचे माजी पदाधिकारी मोहित कंम्बोज यांनी दिला आहे.

मंदिरे सात ऑक्टोबर रोजी सुरु झाली मग क्रूझ पार्टीला परवानगी कोणी दिली असा सवालही कंबोज यांनी विचारतानाच या प्रकरणामागे मोठे सिंडिकेट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एनसीबीने पार्टीचे आयोजन करणाऱ्यांना सुद्धा अटक केली आहे. त्यामुळे त्यांचे परवानगीसाठी कोणासोबतरी संबंध असतील. असे सांगत राज्यपालांकडे नवाब मलिक यांची तक्रार करणार असल्याचेही कम्बोज म्हणाले.

आपल्या पदाचा वापर करुन ते आरोप करत आहेत आणि आपल्या जावयाला वाचवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. दोन दिवसांपासून अनन्या पांडेची सहा तास चौकशी करण्यात आली आहे.

आता पुन्हा तिला सोमवारी चौकशीला बोलविण्यात आले आहे. यामागे तिने मोबाईलमधील चॅट आणि कॉन्टॅक्ट डिलीट केल्याचा संशय आहे.

अनन्याने एनसीबीला आर्यन खानला कोण ड्रग्ज पुरवते त्याची माहिती दिली आहे. कोणत्यातरी सेलिब्रिटीचा नोकर हे ड्रग्ज पुरवित असल्याची टीप तीने एनसीबीला दिली असल्याचे समजते.