अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एकापाठोपाठ एक आरोप करत आहे.

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांनी आर्यन खानला फसवण्यात आल्याचा मोठा दावा करत समीर वानखेडेंना नोकरी गमवावी लागणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

तर नवाब मलिक यांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान नवाब मलिक यांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

माझ्या जावयाला अशाच प्रकरणामध्ये गोवण्यात आले होते आणि आता आर्यन खानलाही फसवण्यात आले आहे. असा आरोप देखील मलिक यांनी केला आहे.