file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तिसरी घटना घडल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध राहुरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे मुलगी आपल्या कुटुंबांसमवेत घरात झोपलेली होती.

पहाटेच्या वेळात मुलगी घरातून गायब असल्याचे दिसून आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, मुलगी सापडली नाही. गेल्या तीन महिन्यांत अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याची ही तिसरी घटना आहे.

यापूर्वी १६ व १४ वर्ष वयाच्या मुलींना पळवून नेले आहे. अपहरणाच्या घटनेला तीन महिन्यांचा कालावधी उलटत असल्याने आमच्या मुलीचा तपास लावण्यात यावा, अशी मागणी करत मुलीच्या आई-वडिलांनी राहुरी पोलिस स्टेशनसमोर एक दिवसाचे उपोषण देखील केले होते.

मात्र, पोलिसांना तपास लागलेला नाही. या पाठोपाठ मुलीच्या अपहरणाची तिसरी घटना तालुक्यात घडली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तालुक्यातील १६ व १४ वयाच्या दोन अल्पवयीन मुलींचे यापूर्वी अपहरण झाले असून या घटनांचा तपास राहुरी पोलिसांना लागलेला नाही. या पाठोपाठ १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तिसरी घटना घडली आहे.