file photo

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- जगविख्यात असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्रीसाईबाबा देवस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाची मागील महिन्यात राज्य शासनाकडून नेमणूक करण्यात आली.

त्यानंतर पदाधिकार्यांनी पदभार देखील स्वीकारला मात्र यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची परवानगी न घेताच पदभार स्वीकारला. यामुळे औरंगाबाद खंडपीठाने नूतन विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठविले आहेत.

त्या निर्णयाला श्रीसाईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाचे नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. शिर्डी येथील श्रीसाईबाबा देवस्थान ट्रस्टचा कारभार हा मागील काही वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या तदर्थ समितीच्या माध्यमातून पहिला जात होता.

मात्र या देवस्थानावर नूतन विश्वस्त मंडळाची नेमणूक करावी अशा आशयाची जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात अली होती.

खंडपीठाने श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमावे असे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्यानंतर नूतन विश्वस्त मंडळाने 17 सप्टेंबर 2021 रोजी पदभार स्वीकारला.

मात्र नूतन विश्वस्त मंडळाने औरंगाबाद खंडपीठाची परवानगी न घेताच सदरचा पदभार स्वीकारल्यामुळे सर्व नूतन सदस्यांना कामकाज करण्यापासून रोखण्याचा 23 संप्टेंबर रोजी आदेश पारित केला आहे.

नेमके काय म्हणाले आहे काळे… औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसारच माझी राज्य शासनाने शिर्डीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदी निवड केली आहे.

परंतु मी पक्षकार नसताना देखील मला अध्यक्ष पदावर काम करण्यावाचून रोखले जात आहे. त्यामुळे मी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.