file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-   मागील आठ दिवसांपासून जीवघेण्या कोरोना आजाराशी झुंजणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांची प्रकृती सुधारत आहे.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना देखील कार्यकर्ते व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदार संघाची माहिती ते जाणून घेत होते.

ही माहिती घेत असताना मतदार संघातील काही गावात डेंग्यू सदृश्य बाधित रुग्ण आढळल्याची माहिती समजली. त्यावेळी आमदार काळे यांनी तातडीने तहसीलदार,

गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी आदी जबाबदार अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाइन बैठक घेऊन साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांत डेंग्यू सदृश्य बाधित रुग्ण आढळून आले. याची माहिती कोरोनावर उपचार घेत असलेल्या आमदार आशुतोष काळे यांना समजली.

स्वत: जरी जीवघेण्या आजाराशी लढत असलो तरी मतदार संघातील नागरिकांचे आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. या भावनेतून त्यांनी तहसीलदार विजय बोराडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप,

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, पालिकेच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रुग्णालयाच्या आरोग्याधिकारी डॉ. गायत्री कांडेकर यांच्या समवेत ऑनलाईन बैठक घेतली.

आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात डेंग्यू सदृश्य बाधित रुग्ण आढळून येत असून आरोग्य विभागाने यापुढे सतर्क राहावे. जनजागृती करून उद्भवणाऱ्या आजारांपासून कसा बचाव करता येईल, यासाठी काळजी घ्यावी.