अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  स्वातंत्र मिळून ७० वर्षे झाली तेव्हापासून निम्मी सत्ता आमची (आमदार राजळेची) होती. आपण जिल्हा परिषदेचे पदे भूषवली व आपल्याकडे आमदाराकीचे पद असताना खरवंडी कासारच्या केंद्र शाळेला इमारत व शाळेला सुविधा देऊ शकला नाही हे तुमचे अपयश आहे, सध्या तालुक्यात काही ना कार्यसम्राट नाव लावले जाते.

पण तुम्ही सत्तेवर असून काही करत नाही. तुमचे कार्य कुठे दिसत नाही, तर फक्त तुम्ही सम्राट दिसता. आपण कार्यसम्राट नसून कोठेही जा नारळ फोडा, या तुमच्या पद्धतीमुळे तुम्ही नारळसम्राट आहात, असा असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे यांनी आमदार मोनिका राजळे यांना नाव न घेता लगावला.

खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद शाळाच्या खोलीचे भूमिपूजन केदारेश्वरचे चेअरमन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी वैभव दहिफळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव जगताप,

खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील, मिथून डोगंरे, दीपक ढाकणे, योगेश अंदुरे, किरण खेडकर, दौलत सोनवणे, महारुद्र कीर्तने, माजी उपसरपंच शरद दहिफळे, राजेंद्र जगताप, धोंडिराम केळग्रंदे, सचिन ढोले, युसुफ बागवान उपस्थित होते. यावेळी अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले,

गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गटामध्ये १५ कोटी रुपयांची विकास कामे झाली. त्यापैकी खरवंडी कासार ग्रामपंचायत अतंर्गत १ कोटी ७ लाख रुपयाचे विकास निधीची कामे झाली.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरवंडी येथे शाळा खोल्या, बंधारे, स्मशानभूमी शेड मंजूर केले. काटेवाडी, तुळजवाडी, ढगेवाडी येथे रस्ते,

बंधारे केले आहेत. जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांच्यामुळे खरवंडी कासार शाळा इमारतीचा प्रश्न मिटला.