आ.विखे पाटील झाले आक्रमक म्हणाले मुख्‍यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्‍यावा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- केंद्रीय तपास यंत्रणेच्‍या आधिका-याला धमकविण्‍याचा प्रकार यापूर्वी राज्‍यात कधीही घडला नव्‍हता, या तपास यंत्रणांना केवळ बदनाम करणा-या मंत्र्यांचा मुख्‍यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्‍यावा

आणि बेताल वक्‍तव्‍य करणा-या वनस्‍पतींच समुळ उच्‍चाटन करण्‍याचे धाडस त्‍यांच्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांनी दाखवावे असे थेट आव्‍हान भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दिले.

लोणी येथे प्रसार माध्‍यमांशी संवाद साधनाता आ.विखे पाटील म्‍हणाले की, स्‍वत:चा भ्रष्‍टाचार झाकण्‍यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्‍याचे कारस्‍थान महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहे.

सरकारमध्‍ये थोडी जरी चाड शिल्‍लक असेल तर त्‍यांनी नबाब मलिकांचा राजीनामा घ्‍यावा अशी मागणी करतांनाच वनस्‍पती असल्‍याचं सांगणा-या नेत्‍यांनाही आवाहन करुन,

बेताल वक्‍तव्‍य करणा-या नेत्‍यांचा नायनाट करा असेही त्‍यांनी ठणकावून सांगितले. महाविकास आघाडी सरकारची आवास्‍था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली असून,

काहीही झाले तरी, केंद्राकडे बोट दाखवायचे एवढाच धंदा त्‍यांचा सुरु आहे. लसिकरण जास्‍त झाले तरी, स्‍वत;ची पाठ थोपटून घेण्‍यातच त्‍यांनी धन्‍यता मानली.

सहकारी साखर कारखान्‍यांच्‍या बाबत‍ही राज्‍य सरकार दुजाभाव करीत आहे. विरोधकांच्‍या कारखान्‍यांना थकहमी नाकारली जात आहे,

मात्र केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडेल असा विश्‍वास व्‍यक्‍त करतानाच राज्‍य सरकारने आपली भूमिका जाहीर केली पाहीजे असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!