अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात पहाटेच आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे.

मनसैनिकांनी पहाटे अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा सुरू केली. ठाण्यातील इंदिरानगरच्या मशिदीसमोरील मंदिरावर भोंगे लावण्यात आले.

नवी मुंबईतही ऐरोलीसह आणखी काही ठिकाणी आंदोलन झाले. ठाकरे यांच्या आदेशानुसार कार्यकर्ते तयारच होते.पहाटे अजान सुरू होताच हनुमान चालीसा सुरू झाला.

पोलिसही रात्रभर रस्त्यावर होते. रात्रीच नोटिसा आणि धरपकड सुरू होती. पहाटे भोंगे लावल्याचे लक्षात येताच पोलसानी धाव घेत कारवाई केली. औरंगाबादसह सर्व शहरात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात येत आहेत.