file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- संघटीत गुन्हे करणार्‍या दोन टोळ्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) कलमान्वये कारवाई करण्यात आली होती.

विजय राजु पठारे (वय 40) व त्याच्या टोळीतील अजय राजु पठारे (वय 25), बंडु ऊर्फ सुरज साहेबराव साठे (वय 22), अनिकेत विजु कुचेकर (वय 22),

प्रशांत ऊर्फ मयुर राजु चावरे (वय 24), अक्षय गोविंद शिरसाठ (वय 23 सर्व रा. सिद्धार्थनगर, नगर) यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या दोन्ही टोळ्याविरोधात नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मोक्का विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत. या टोळीने तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत मार्चमध्ये दरोड्याचा गुन्हा केला होता. तसेच या टोळीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल आहेत.

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तोफखाना पोलिसांनी पठारे टोळीविरूद्ध मोक्का लावण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली होती.

पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून पठारे टोळीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

कुख्यात गुन्हेगार राहुल निर्वाश्या भोसले (वय 22 रा. सारोळा कासार ता. नगर) व त्याच्या टोळीतील उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय 33 रा. बुरूडगाव ता. नगर), दगू बडूद भोसले (वय 27 रा. पडेगाव ता. कोपरगाव),

निवाश्या चंदर ऊर्फ सिताराम भोसले (रा. सारोळा कासार) व पप्या मोतीलाल काळे (रा. पैठण ता. जि. पैठण) या टोळीने नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याचा गुन्हा केला होता. सदर टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.