अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लाँडरिंग अटक करण्यात आली आहे.

मनी लाँडरिंग प्रकरणी ईडी (ED) कडून चौकशी सुरु आहे. यामध्ये आता पुण्यातील मोठा अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.

१०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी सुरु आहे. चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांची चौकशी सुरु आहे.

त्याचबरोबर सचिन वाझे यांचींही चौकशी सुरु आहे. सचिन वाझे यांची चौकशी सुरु असताना अनिल देशमुखही उपस्थित होते.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी (IPS Transfer racket) सक्तवसुली संचालनालयाने (ED) आता पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुण्याच्या पोलीस उपायुक्तांचाही समावेश आहे.

देशमुखांशी निगडीत मनी लाँडरिंग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटमध्ये पोलीस खात्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या पाठीमागे चौकशीचा सिलसिला सुरु आहे.

अगोदरही ईडीने मोठमोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. यामध्ये राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड(Kailas Gaikwad) यांना समन्स बजावले होते.तसेच त्यांना चौकशीला बोलावले होते.