Fixed Deposit : देशातील 2 मोठ्या बँका FD वर देतायेत बंपर व्याज, बघा कोणत्या?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit : आयसीआयसीआय बँक आणि फेडरल बँक सध्या मुदत ठेवींवरील जास्त व्याजदर देत आहे. ICICI बँकेने बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर अधिक व्याज देणार आहे. नवीन दर 8 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत.

बँक आता जास्तीत जास्त 7.40 टक्के वार्षिक व्याज देत आहे. त्याचवेळी, फेडरल बँक एफडीवरील व्याजदरात वाढ केल्यानंतर, ग्राहकांना जास्तीत जास्त 8 टक्के वार्षिक दराने व्याज मिळू शकते. फेडरल बँकेचे नवे व्याजदर 6 फेब्रुवारीपासून लागू केले आहेत.

ICICI बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. बँक 1 वर्ष ते 389 दिवसांत परिपक्व होणाऱ्या बल्क एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे.

बँक या कालावधीच्या FD वर 7.40 व्याज देत आहे. फेडरल बँक सामान्य नागरिकांना 500 दिवसांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याज देत आहे.

ICICI बँक

ICICI बँक आता सर्वसामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 14 दिवस आणि 15 ते 29 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के व्याज देत आहे. 30 ते 45 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. ग्राहकांना 46 ते 60 दिवसांच्या FD वर 5.75 टक्के व्याज मिळत आहे.

61 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के, 91 दिवस ते 120 दिवसांच्या एफडीवर 6.50 टक्के, 121 दिवस ते 150 दिवस आणि 151 ते 184 दिवसांसाठी 6.50 टक्के, 185 दिवस ते 210 दिवस आणि 211 दिवस ते 270 दिवसांसाठी 6.75 टक्के बँक टक्के व्याज देत आहे.

271 ते 289 दिवसांच्या FD वर बँक 6.85 टक्के व्याज देत आहे. ICICI बँक सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्ष ते 389 दिवसांच्या FD वर 7.40 टक्के व्याज देत आहे.

फेडरल बँक

तुम्ही फेडरल बँकेत 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD मिळवू शकता. बँकेने 500 दिवसांचा व्याजदर सर्वसामान्यांसाठी 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 टक्के केला आहे.

बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. फेडरल बँक ग्राहकांना 7 ते 29 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3 टक्के आणि 30 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.25 टक्के व्याज देत आहे.

ग्राहकांना 46 दिवस ते 60 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4.00 टक्के वार्षिक व्याज आणि 61 दिवस ते 119 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4.75 टक्के वार्षिक व्याज मिळेल.

120 ते 180 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 5 टक्के, 181 दिवस ते 270 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 5.75 टक्के, 271 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर 6 टक्के आणि 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 6.80 टक्के व्याजदर बँक देईल.