FD Interest Rates : जेव्हा-जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा निश्चितच मुदत ठेव (FD) चे नाव समोर येते. मुदत ठेवीतील गुंतवणूक सुरक्षिततेसह खात्रीशीर परतावा देखील देते. म्हणूनच आज सर्वत्र गुंतवणुकीचा हा पर्याय लोकप्रिय आहे. अशातच तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांच्या व्याजदराबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला जबरदस्त परतावा देत आहेत.
साधारणपणे बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD ऑफर करतात. अल्पकालीन ठेव कालावधी 7 दिवस ते 12 महिन्यांदरम्यान असू शकतो. दीर्घकालीन ठेव कालावधी 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत असतो. आज आपण कमी कालावधीच्या म्हणजेच एक वर्षाच्या ठेवणींवर कोणती बँक जास्त परतावा देत आहे ते पाहणार आहोत.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याजदर ऑफर करते.
ICICI बँक
एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याजदर ऑफर करते.
येस बँक
येस बँक 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 3.25 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देते.
SBI
SBI सामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 5.75 टक्के व्याजदर देते.
PNB
SBI सामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 5.75 टक्के व्याजदर देते.
कॅनरा बँक
कॅनरा बँक 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 4 टक्के ते 6.85 टक्के व्याजदर देते.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 4.50 टक्के ते 7.85 टक्के व्याजदर देते.