आर्थिक

Sahara Refund Latest Update: सहारा इंडियामध्ये तुमचेही पैसे अडकले आहेत का? मिळेल का लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आनंदाची बातमी!

Published by
Ajay Patil

Sahara Refund Latest Update:- सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत व काही दिवसांवर निवडणुकांना सुरुवात देखील होण्याची शक्यता आहे. परंतु अजून पर्यंत तरी सहारा इंडियामध्ये ज्या गुंतवणूकदारांचे पैसे गुंतलेले आहेत ते वापस मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आशेचा किरण अजून पर्यंत तरी दिसत नाही.

सहारा इंडिया रिफंड पोर्टलच्या माध्यमातून बऱ्याच व्यक्तींनी पैसे परत मिळण्यासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु त्यांना अजून पर्यंत पैसा परत मिळालेला नाही. सहारा कंपनीमध्ये कोट्यावधी गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपये गुंतलेले आहेत. तुम्हाला माहितीसाठी आम्ही सांगतो की, या कंपनीचे सेबीकडे जवळपास 25 हजार कोटी रुपये जमा आहेत

सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर 5000 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत केले गेले. परंतु अजून पर्यंत अशा गुंतवणूकदारांची संख्या बरीच आहे की त्यांना अजून देखील एक रुपया देखील मिळालेला नाही. साधारणपणे आकडेवारी पाहिली तर या कंपनीत 9.88 कोटी गुंतवणूकदारांचे जवळपास 86 हजार 673 कोटी रुपये अडकलेले आहेत.

ही रक्कम खूप मोठी असल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळण्यासाठी अजून तरी प्रतीक्षा करावी लागू शकते. या सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याच्या बाबतीत स्थिती पाहिली तर लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच याबाबतीत काही निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

 सहारा रिफंड रकमेमध्ये केली गेली वाढ

जेव्हा सहारा रिफंड पोर्टल सुरू करण्यात आले होते तेव्हा अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना एकावेळी जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळत होती. परंतु आता सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदार 19999 पर्यंतच्या रकमेसाठी क्लेम करू शकणार आहेत.

तुमची जी काही मूळ रक्कम आहे त्यासाठी हा क्लेम असणार आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे यावर कुठल्याही प्रकारचा व्याजाचा लाभ मिळणार नाही. तसेच सहारा इंडिया रिफंड पोर्टलवर जर काही समस्या क्लेम करताना येत असतील तर सरकारच्या माध्यमातून अशा लोकांना मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता सरकारच्या माध्यमातून काही टोल फ्री नंबर देखील जारी करण्यात आलेले आहेत.

 सहारा रिफंड पोर्टलवर अर्ज करताना काही समस्या येत असतील तर या ठिकाणी साधा संपर्क

या ठिकाणी अर्ज करताना जर काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर खाली दिलेल्या टोल फ्री नंबर वर तुम्ही कॉल करून तुमची समस्या सोडवू शकतात.

0522-6937100,0522-3108400,0522-6931000 या नंबरवर संपर्क साधता येईल.

 सहारामध्ये असलेली गुंतवणूकदारांची संख्या

1 पाच हजार ते दहा हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 65.48 लाख

2- 10 हजार ते वीस हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 69.74 लाख

3- 30000 ते 50 हजार रुपया पर्यंत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या 19.56 लाख

4- 50 हजार ते एक लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या 12.95 लाख

5- एक लाखापेक्षा जास्त पैसे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची एकूण संख्या 5.12 लाख इतकी आहे.

Ajay Patil