आर्थिक

PPF Scheme: पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीसाठी 5 एप्रिल ही तारीख का आहे महत्त्वाची? 2.5 लाखाच्या फायद्याशी आहे संबंध!

Published by
Ajay Patil

PPF Scheme:- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजना ही एक गुंतवणुकीचा दीर्घकालीन उत्तम असा पर्याय असून या योजनेमध्ये आकर्षक व्याजदर आणि गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळतो.

तुम्हाला देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वतःच्या नावाने आणि अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे उघडता येते. पीपीएफ खाते उघडण्यासाठी कमीत कमी 100 रुपये आवश्यक आहेत व एखाद्याला आर्थिक वर्षात किमान पाचशे रुपये जमा करणे आवश्यक आहे.

या योजनेमध्ये कमाल गुंतवणुकीचे मर्यादा प्रति वर्ष दीड लाख रुपये निश्चित केलेली असून ही रक्कम तुम्ही वर्षाला कमाल 12 हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी देखील जमा करू शकतात.

या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षाचा आहे व एक वर्षाच्या आत पाच वर्षाकरिता यामध्ये वाढ करता येऊ शकते. परंतु या योजनेमध्ये जर गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल तर 5 एप्रिल या तारखेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 पाच एप्रिल पूर्वी या योजनेत दीड लाख रुपये गुंतवल्यास मिळेल अधिक व्याज

जर आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ खात्यातील एकूण व्याजाचा विचार केला तर ते आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा होते व व्याजदर महिन्याला मोजला जातो. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या दरम्यान सर्वात कमी खात्यातील शिल्लक वर त्याची गणना केली जाते.

पाच तारखेनंतर पैसे जमा केल्यास त्या महिन्याच्या ठेवीवर व्याज दिले जाणार नाही. तुम्ही जर पाच एप्रिल पर्यंत पीपीएफ मध्ये एकूण दीड लाख रुपये जमा केले तर तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी एकूण रकमेवर अधिक व्याजाचा लाभ मिळू शकतो. या योजनेमध्ये तुम्ही मासिक,

त्रैमासिक किंवा एकरकमी पैसे जमा करू शकतात. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने जर पाच एप्रिल पूर्वी एकरकमी दीड लाख रुपये गुंतवले तर पंधरा वर्षानंतर त्याला पाच एप्रिल नंतर एकरकमी किंवा मासिक गुंतवणूक करणाऱ्या इतर गुंतवणूकदारांपेक्षा अडीच लाख रुपयांचा अधिक फायदा मिळतो. कारण यामध्ये एकरकमी रक्कम 5 एप्रिल पूर्वी जमा केल्यास चक्रवाढीमुळे जास्त व्याज उत्पन्न मिळते.

 5 एप्रिलची तारीख चुकली तर काय करावे?

समजा तुम्ही एकरकमी रक्कम पाच एप्रिल पूर्वी जमा करू शकले नाही तर पुढील महिन्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या पाच तारखेपूर्वी ती रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्हाला फक्त एप्रिल महिन्याचे व्याज मिळणार नाही.

परंतु त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यात पाच तारखेला किंवा त्या अगोदर जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळेल. या योजनेमध्ये गुंतवणूकदार हे आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत दीड लाखापर्यंत कर कपातीचा दावा देखील करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil