Fixed Deposit : 5 वर्षांची FD तुम्हाला बनवेल मालामाल! ‘या’ बँका देतायेत बंपर व्याज, PPF सारख्या योजनांनाही सोडले मागे…

Content Team
Published:
Fixed Deposit

Fixed Deposit : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम व्याजदर हवा असेल आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या ग्राहकांना एफडीवर बक्कळ परतावा ऑफर करत आहेत.

सध्या अनेक खासगी बँकांकडून एफडीवर बंपर व्याज दिले जात आहे. रेपो रेट 6.5 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर अनेक बँका एफडीवर चांगला परतावा देत आहेत. यामध्ये युनिटी आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे देखील नाव आहे. या बँका ग्राहकांना एफडीवर 9 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत.

या दोन्ही लघु वित्त बँकांमधील काही मुदतीच्या FD वरील परतावा PPF, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या गुंतवणूक योजनांपेक्षा खूप जास्त आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना 4.5 टक्के ते 9 टक्के पर्यंत व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 9.5 टक्के व्याज देत आहे. हे व्याज एफडीवर 1001 दिवसांच्या कालावधीसह दिले जात आहे. परंतु सामान्य गुंतवणूकदारांसाठी हे व्याज 9 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीत ठेवींवर बँकेकडून 4.5 टक्के ते 9.5 टक्के पर्यंत व्याजदर मिळतात.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 4 टक्के ते 9.1 टक्के पर्यंत व्याज देत आहे. बँकेकडून, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.5 टक्के ते 9.6 टक्के पर्यंत व्याज मिळत आहे.

येथे पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9.1 टक्के व्याजदर दिला जातो. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने सांगितले की, नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या ठेवींवर 9.10 टक्के व्याजदर मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 0.5 टक्के जास्त म्हणजे 9.60 टक्के आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe