7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! डीए वाढीबाबत आले सर्वात मोठे अपडेट, आता ‘इतका’ वाढणार पगार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता लॉटरी लागू शकते. कारण केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात कधीही वाढ करू शकते. सध्या या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के डीएचा लाभ देण्यात येत आहे. आता त्यात 4 टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता 46  टक्के होऊ शकतो.

जर असे झाले तर याचा फायदा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारकडून वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. आता पुढच्या महिन्यात सरकार महागाई भत्त्यात वाढ करू शकते.

केंद्र सरकार आता लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढीसह अडकलेल्या डीए थकबाकीचे तीनही हप्ते ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळे ही रक्कम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या मोठ्या भेटवस्तूपेक्षा कमी नसणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारकडून अधिकृतपणे महागाई भत्ता वाढीची तारीख जाहीर करण्यात आली नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये 15 जुलै 20023 पर्यंत दावा केला जात आहेत.

इतका वाढणार महागाई भत्ता

मोदी सरकारकडून आता केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे, त्यानंतर तो या वाढीनंतर 46 टक्के होईल. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बंपर वाढ होणार आहे. सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के डीएचा लाभ दिला जात आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. त्याचे दर हे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून प्रभावी मानले जातात. समजा सरकारने आता जर महागाई भत्ता वाढवला तर त्याचा फायदा १ जुलैपासून सुरू होणार आहे.

केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता थकबाकीबाबत एक मोठे अपडेट देणार आहे, त्यामुळे त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीचे पैसे खात्यात जमा होत असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या काळात डीएची थकबाकी कोरोनाच्या काळात पाठवली नाही, ज्याची मागणी कर्मचारी संघटना सतत करत आहेत.