आर्थिक

मोदी सरकारने स्पष्टच सांगितलं ! 18 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना…

Published by
Ajay Patil

7th Pay Commission:- केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता महत्वपूर्ण असून याचा प्रत्यक्ष परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत असतो व त्यामुळे महागाई भत्त्याच्या बाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून अनेक अपेक्षा व मागण्या आहेत.

महागाई भत्त्याच्या संदर्भातील जर आपण एक प्रमुख मागणी बघितली तर ती अशी आहे की जेव्हा संपूर्ण जगामध्ये कोविड महामारीने थैमान घातले होते. तेव्हा महागाई भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली नव्हती व ती तब्बल 18 महिन्यांपर्यंत थांबवण्यात आली होती.

तीच महागाई भत्त्याची 18 महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळावी याकरिता सरकारवर दबाव तयार केला जात आहे. जवळजवळ ही महागाई भत्त्याची थकबाकी 34 हजार कोटींपेक्षा अधिक आहे व ती अद्याप कर्मचाऱ्यांना मिळणे बाकी असून ती कधी मिळेल या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत.

 विरोधी खासदारांकडून संसदेत याबाबतीत विचारले गेले प्रश्न

कोविड महामारीच्या कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता थांबवण्यात आला होता व तो जवळपास 18 महिने थांबवला होता. त्यामुळे कोविड काळातील 18 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे व तसा दबाव देखील सरकारवर निर्माण केला जात आहे.

विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेत प्रश्न

काल याबाबतीत विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेत प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोना काळातील महागाई भत्त्याची 18 महिन्याची थकबाकी अद्याप दिली गेली नाही. याबाबत सरकारचा काय विचार आहे किंवा सरकार काय विचार करत आहे? या स्वरूपाचा प्रश्न विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेमध्ये उपस्थित केला व याला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देखील दिले.

 काय म्हटले अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी?

विरोधी खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशाचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटले की, देशामध्ये कोरोना महामारी मुळे एक जानेवारी 2020 ते 1 जुलै 2020 आणि एक जानेवारी 2021 या कालावधीमध्ये महागाई भत्त्याची रक्कम थांबवण्यात आलेली होती.

थकबाकी देण्याची ही योग्य वेळ नाही

कारण कोरोना महामारीच्या कालावधी ज्या काही देशापुढे आर्थिक समस्या होत्या त्या टाळण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अजून देखील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची ही योग्य वेळ नाही असे त्यांनी म्हटले. पुढे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, सरकारी कर्मचारी संघटना व त्याशिवाय अनेक संघटनाच्या माध्यमातून याबाबत पत्र प्राप्त झालेली आहेत.

थकबाकी देण्याचा कोणताही विचार नाही !

परंतु कोरोना महामारीचा परिणाम अद्याप देखील दिसून येत आहे. त्यामुळे ही 18 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्याचा सध्या तरी सरकारचा कोणताही विचार नाही. यावरून आपल्याला स्पष्ट होते की, अजून तरी कर्मचाऱ्यांना 18 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Ajay Patil