आर्थिक

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही ? कधी लागू होऊ शकतो आठवा वेतन आयोग?

Published by
Ajay Patil

8th Pay Commission:- मागील काही महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. जेव्हा या निवडणुकीचा कालावधी होता तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत आणि महागाई भत्ता वाढ इत्यादी बाबत अनेक प्रकारचे तर्क वितर्क लढवले जात होते.

लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातून आठवा वेतन आयोग लागू करू शकते अशा पद्धतीच्या चर्चा देखील अनेक मीडिया  रिपोर्टच्या माध्यमातून आपण वाचले किंवा ऐकले असतील.

परंतु नंतर लोकसभेचा निकाल लागला व पुन्हा तिसऱ्यांदा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत व सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र अजून पर्यंत आठव्या वेतन आयोग याबाबत सरकारने कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतलेल्या नाही व त्यामुळे आता आठव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातल्या मागणीने पुन्हा एकदा जोर पकडल्याची स्थिती आहे.

एवढेच नाही तर नुकताच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अगोदर देखील केंद्र सरकारकडे आठव्या वेतन आयोगा संदर्भात पाठपुरावा करण्यात आलेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यसभेमध्ये काही दिवसांपूर्वी आठवा वेतन आयोगा संदर्भात एक लेखी प्रश्न मांडण्यात आला होता व त्याला सरकारच्या माध्यमातून अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देखील दिले आहे.

 आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही?

राज्यसभेत नुकताच काही दिवसांअगोदर आठवा वेतन आयोग संदर्भात एक लेखी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता व त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत उत्तर दिले.

यामध्ये त्यांनी सांगितले की जून 2024 मध्ये आठवा वेतन आयोग लागू करावा किंवा तो स्थापन करावा याकरिता दोन विनंती प्राप्त झाल्या आहेत.

परंतु केंद्र सरकारच्या विचाराधीन याबाबत अजून तरी कुठलाही प्रस्ताव नाही. त्यामुळे आठव्या वेतन आयोग स्थापन होण्याकरिता अजून तरी काही कालावधी करिता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या उत्तरावरून स्पष्ट होते.

 साधारणपणे कधी लागू होऊ शकतो आठवा वेतन आयोग ?

तर आतापर्यंत जे काही वेतन आयोग लागू केले गेले आहेत त्यानुसार जर आपण बघितले तर साधारणपणे दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे काही वेतन व भत्ते मिळत आहेत ते सातव्या वेतन आयोग अंतर्गत मिळत आहेत.

आपल्याला माहित असेलच की, सातवा वेतन आयोग हा 2014 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता व 2016 मध्ये तो लागू झाला होता व त्यानुसार 2024 मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन होणे गरजेचे होते किंवा तशी अपेक्षा होती व स्थापन झाल्यानंतर जानेवारी 2026 मध्ये नवीन आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला जाईल अशी एक अपेक्षा आहे.

परंतु आता सरकार याबाबत कधी निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग लागू केला गेला तर त्याचा फायदा देशातील एक कोटी कर्मचारी व पेन्शनधारकांना होणार आहे. तसेच यामुळे कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ होईल व पगारात देखील भरीव वाढ होणार आहे.

Ajay Patil