Fixed Deposit Rates : सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे एफडी, येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, म्हणूनच देशातील जवळ-जवळ सर्वचजण येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. येथे सुरक्षितता असली तरीदेखील यावर मिळणार परतावा हा खूप कमी आहे.
अशातच तुम्ही सध्या सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर आज आम्ही अशा बँका घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला सुरक्षेसह एफडीवर जबरदस्त परतावा देखील देत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया…
सध्या देशातील टॉप 5 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर जोरदार परतावा ऑफर करत आहेत. तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या पाच बँकांमध्ये दिल्या जाणाऱ्या FD सुविधा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
आयसीआयसीआय बँक
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर चांगले व्याजदरही देत आहे. जर ज्येष्ठ नागरिक ICICI बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील, तर ते एक वर्ष ते 15 महिन्यांच्या FD साठी 7.25 टक्के व्याजदरासह परतावा देते. यासोबतच 15 महिने ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.05 टक्के व्याज दिले जात आहे.
एचडीएफसी बँक
ही बँक एक वर्ष ते 15 महिन्यांच्या कालावधीसाठी FD साठी 7.10 टक्के दराने व्याज देत आहे. यानंतर, 15 महिने ते 18 महिन्यांच्या FD कालावधीसाठी 7.60 टक्के दराने व्याज दिले जाते. याशिवाय, 18 महिने ते 2 वर्षे 11 महिने कालावधीच्या FD वर 7.50 टक्के दराने व्याज दिले जाते.
बँक ऑफ बडोदा
ही बँक एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी 7.35 टक्के दराने व्याजही देत आहे. यानंतर, दोन वर्षे ते तीन वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एक वर्ष ते दोन वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.30 टक्के दराने व्याज देत आहे. त्यानंतर दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. SBI ने अमृत कलश योजना देखील सुरु केली आहे. ज्यामध्ये 400 दिवसांच्या FD योजनेवर 7.60 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
बँक कोटक महिंद्रा बँक
ही बँक 390 दिवसांच्या एफडीसाठी 7.65 टक्के दराने व्याज देत आहे. यामध्ये 23 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 7.80 टक्के दराने व्याज दिले जात आहे.