Categories: आर्थिक

थर्टी फर्स्टच्या रात्री झोमॅटोकडून विक्रम; एका मिनिटामागे तब्बल ‘इतक्या’ ऑर्डर्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- देशभरात फूड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या झोमॅटो ने नववर्षाच्या स्वागताचा एक विक्रम झाला आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री झोमॅटोला दर एका मिनिटामागे तब्बल तब्बल ४१०० फूड डिलिव्हरी ऑर्डर आल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंदर गोयल यांनी याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.थर्टी फर्स्टच्या रात्री त्यांना मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे कंपनीच्या तांत्रिक टीमची झोप उडाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोयल यांनी यासंदर्भातील ट्विट ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वा ५३ मिनिटांनी एक ट्विट केले.”कंपनीच्या सिस्टममध्ये तुफान ओरडर्स आल्या आहेत. देशाच्या विविध भागात सध्या २० हजार लोकांना बिर्याणी पोहोचवण्याचे काम केले जात आहे.

तर १६ हजार लोकांना पिझ्झाची डिलिव्हरी सुरु आहे. यातील ४० टक्क्यांहून अधिक जणांनी एक्स्ट्रा चीज पिझ्झा ऑर्डर केलाय.”अशी माहिती गोयल यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

भारताबाहेरून विशेषतः युएई,लेबेनॉन,तुर्की येथूनही भारतीयांनी त्यांच्या नातेवाइकासांठी ऑर्डर दिली असल्याचे म्हटले आहे. झोमॅटो च्या इतिहासात आजपर्यंतची हि सगळ्यात मोठी ऑर्डर असल्याचे सांगण्यात आले.

३१ डिसेंबरला सायं ६ वाजून १४ मिनिटांना २५०० ओरडर्स ते रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी दर मिनिटामागे ४१०० ऑर्डर आल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24