Benefit Of Investment In FD:- गुंतवणूक ही दीर्घकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून उत्तम अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे खूप गरजेचे आहे.
जर आपण गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर यामध्ये बँक, पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना तसेच शेअर मार्केट आणि अलीकडच्या कालावधीत अतिशय लोकप्रिय झालेला प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपी होय. एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना असून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक स्मार्ट आणि प्रभावी मार्ग आहे.
एसआयपीच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला काही कालावधीनंतर त्याची गुंतवणूक वाढवण्याची मोठी संधी मिळते. यामध्ये गुंतवणुकीला तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात करू शकतात व कालांतराने तुम्हाला मोठ्या प्रमाणात भांडवल देखील यामध्ये जमा करता येते.
एसआयपीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर याचे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शेअर बाजारातील चढउतारांपासून सुरक्षित राहून यामध्ये नियमितपणे गुंतवणूक करता येते.
तसं पाहायला गेले तर एसआयपी थेट शेअर बाजाराशी कनेक्ट असल्यामुळे त्यात थोडीफार प्रमाणात जोखीम असते.समजा तुम्ही एसआयपीमध्ये जर गुंतवणूक केली तर प्रामुख्याने तुम्हाला दोन प्रकारचे फायदे या माध्यमातून मिळतात.
येथील जर पहिला फायदा बघितला तर तुम्ही नियमितपणे छोटी गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा करू शकतात आणि दुसरा फायदा म्हणजे यामध्ये चक्रवाढीचा देखील तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो व चांगला परतावा मिळवता येतो.ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालासाठी गुंतवणूक करायची आहे
अशा गुंतवणूकदारांसाठी एसआयपी मधील गुंतवणूक एक फायद्याची आहे. तुम्ही जर एसआयपीमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुमच्या गुंतवणुकीवर बाजारातील चढउताराचा काही फरक पडत नाही.
एसआयपीतील गुंतवणुकीतून साडेतीन कोटी रुपयांचा निधी कसा तयार होऊ शकतो?
समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी करत आहात आणि त्या गुंतवणुकीवर तुम्हाला सरासरी वार्षिक 12 टक्क्यांचा परतावा मिळेल. तर अशा परिस्थितीत तुमची गुंतवणूक 30 वर्षात साडेतीन कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचते.
यामध्ये प्रति महिना दहा हजार रुपये याप्रमाणे तीस वर्षात तुमची 36 लाख रुपयांची मूळ गुंतवणूक होते व यामध्ये तुमचा अपेक्षित परतावा हा तीन कोटी 16 लाख 99 हजार 138 रुपये इतका होतो. समजा तुम्हाला वार्षिक पंधरा टक्के परतावा मिळाला असेल तर हा कालावधी २६ वर्षापर्यंत कमी होतो.
म्हणजेच तीन कोटीच्या आसपास निधी जमवण्यासाठी तुम्हाला पंधरा टक्के परतावा मिळाला तर अवघे 26 वर्षे लागतात. यामध्ये तुमचा कॉर्पस 31 लाख 20 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह तुमचा परतावा तीन कोटी ५१ लाख ३० हजार २४५ रुपयांच्या परताव्यासह सुमारे 3.8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम हे समजून घ्यावे की, एसआयपीमध्ये गुंतवणूक केलेली तुम्हाला निश्चित परताव्याच्या हमी मिळत नाही.
बाजारातील चढउतारामुळे परतावा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक देखील असू शकतो. त्यामध्ये कधी तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत परतावा देखील मिळेल तर कधी -10 टक्के देखील निगेटिव्ह परतावा मिळू शकतो.
तसेच दीर्घकालीन भांडवली नफा कर देखील एसआयपी परताव्यावर लागू होतो. जर तुमची गुंतवणूक एक लाख रुपयापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही ती एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवली असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. केंद्र सरकारने 2024 मध्ये हा कर 10 टक्क्यांवरून 12.5% केला आहे. ज्यामुळे तुमच्या एकूण निधीवर परिणाम होऊ शकतो.