आर्थिक

Fixed Deposit : एक छोटीशी चूक FD धारकांना पडेल महागात ! गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Fixed Deposit : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे बँकेची एफडी आहे. एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, म्हणून गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एफडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लोकं त्यांच्या इच्छेनुसार गुंतवणूक कालावधी निवडू शकतात आणि निवडलेली वेळ संपते तेव्हा ते पैसे त्यांच्या खात्यात व्याजासह जमा केले जातात.

येथील गुंतवणूक ही फायद्याची असली तरी देखील गुंतवणूक सल्लागार मानतात की त्यालाही काही मर्यादा आहेत. यामध्ये बँकांनी थकबाकी चुकवल्यास तुमचे पैसे गमावण्याचा धोका असतो. तसेच मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास दंड देखील भरावा लागतो. अशास्थितीत गुंतवणूकदाराने त्याबद्दल समजून घेणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे नुकसान सांगणार आहोत, जेणेकरून गुंतवणूक करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

कमी व्याज अधिक दंड

यामध्ये व्याज कमी आणि दंड जास्त भरावा लागतो. तसेच तुम्हाला गरजेनुसार पैसे काढायचे असतील तर तुम्हाला वेळेपूर्वी एफडी मोडता येत नाही. आणि जर तुम्ही ती मोडली तर बँक तुम्हाला व्याज देणार नाही आणि वर तुम्हालाच दंड भरावा लागेल. एफडी करताना काय दंड होऊ शकतो हे अटींमध्ये लिहिलेले असते. हे बँकेनुसार बदलू शकते.

डीफॉल्टचा धोका

बँक बुडण्यासारखी परिस्थिती अनेकवेळा पाहण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांच्या ठेवींचा धोका वाढतो. नवीन नियमानुसार, बँक कोसळल्यास, एकूण ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँकेत 15 लाख रुपयांची एफडी केली असेल आणि ती बँक दिवाळखोरीत निघाली तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपयेच मिळतील. उर्वरित 10 लाख रुपये गमावण्याचा धोका आहे.

कमी नफा

बाजारात झालेल्या नफ्याचा कोणताही फायदा येथे होत नाही. कारण यामध्ये व्याजदर स्थिर राहतो. जर महागाईचा दर 6 टक्के झाला आणि तुम्हाला मिळणारे व्याज फक्त 5 ते 6 टक्के असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त नकारात्मक परतावा मिळेल.

कमी परतावा

मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा पहिला तोटा म्हणजे त्यातील व्याजदर निश्चित असतो. म्हणजे बँकेने तुम्हाला दिलेले व्याज स्थिर राहते. स्टॉक किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या इतर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये तुम्हाला मिळणारे व्याज FD पेक्षा जास्त आहे.

Ahmednagarlive24 Office