आर्थिक

सोलापूर : तरुणाने 3 हजारात सुरू केला व्यवसाय ! आता पाच लाखांचे उत्पन्न…

Published by
Ajay Patil

तुम्ही जेव्हा कुठलाही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात तेव्हा तुम्हाला ज्या व्यवसायामध्ये आवड असते खूप गरजेचे असते. कारण व्यक्तीला ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या गोष्टीची आवड असते व त्यामध्ये जर व्यक्तीने करिअर किंवा व्यवसाय केला तर व्यक्ती लवकर यशस्वी होते असे म्हटले जाते व ते सत्य देखील आहे.

महत्त्वाचे  म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करत आहात यावर व्यवसायापासून मिळणारा नफा किंवा पैसा अवलंबून नसतो तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही घेत असलेले कष्ट तसेच तुमच्यात असलेली जिद्द या गोष्टींना खूप महत्त्व असते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सोलापूर शहरातील सादिक बेग या व्यावसायिकाचा विचार केला तर यांनी तीन हजार रुपयांपासून ट्रॉफी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला व आज त्यातून ते लाखो रुपयांची उलाढाल  करत असून इतर तरुणांना देखील त्यांच्यापासून प्रेरणा मिळण्यास मदत झालेली आहे.

 सादिक यांनी तीन हजार रुपये गुंतवणुकीतून सुरू केला व्यवसाय

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सादिक बेग हे सोलापूर शहरातील गुरुनानक चौक, कुर्बान हुसेन नगर मध्ये राहायला असून त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी बीए पूर्ण केलेले आहे. शिक्षण पूर्ण करून कुठलातरी व्यवसाय सुरू करावा ही त्यांची इच्छा होती व 2005 पासून त्यांनी गिफ्ट बनवण्याचे काम सुरू केले.

ट्रॉफी बनवण्याचा व्यवसायाला सुरुवात

परंतु नंतर जेव्हा देशामध्ये कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन लावण्यात आला तेव्हा त्यांनी घरात बसून विविध खेळ तसेच शाळेत बक्षीसासाठी लागणाऱ्या ट्रॉफी कशाप्रकारे बनवल्या जातात यावर पूर्ण अभ्यास केला व तीन हजार रुपयांची गुंतवणूक करून ट्रॉफी बनवण्याचा व्यवसायाला सुरुवात केली.

दहा हजार रुपयांपर्यंतच्या ट्रॉफी

या विनर ट्रॉफी शॉपमध्ये तुम्हाला पन्नास रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या ट्रॉफी खरेदी करता येतात. अनेक कॉलेज तसेच शाळा व क्रिकेट क्लबचे सदस्य त्यांच्या या विनर ट्रॉफी शॉप मध्ये येऊन आपल्या इच्छेनुसार ट्रॉफी बनवून घेऊन जातात. सादिक बेग यांच्या या शॉपमध्ये तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये उत्तम क्वालिटीच्या ट्रॉफी बनवून मिळतात.

विशेष म्हणजे त्यांच्या या शॉप मध्ये तुम्हाला ट्रॉफीवर विनरचे नाव किंवा क्लबचे नाव प्रिंट करायचे असेल तर त्याकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही.त्यांच्या या ट्रॉफी शॉपमध्ये वेगळी सर्टिफिकेट तसेच मेडल, प्रमाणपत्र देखील बनवून दिले जातात. मोमेंटो ट्रॉफी, ऍग्रीलीक ट्रॉफी तसेच फायबर ट्रॉफी, मेटल ट्रॉफी, डायमंड  ट्रॉफी आणि उडन ट्रॉफी देखील बनवून तुम्हाला मिळते. ग्राहकांना ज्या प्रकारचे ट्रॉफी बनवून घ्यायची असेल त्या प्रकारची ट्रॉफी तुम्हाला या शॉपमध्ये मिळते.

 वर्षाला करतात चार ते पाच लाखांची उलाढाल

सादिक बेग त्यांच्या या विनर ट्रॉफी शॉप च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफी विक्रीतून वर्ष अखेर चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.अगदी कोरोना कालावधीमध्ये वेळेचा सदुपयोग करून ट्रॉफी विषयीची माहिती घेत तीन हजार रुपयांच्या गुंतवणुकीत  सुरू केलेला त्यांचा हा व्यवसाय हा त्यांना चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देतो व त्यांचा हा प्रवास इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

Ajay Patil