Aadhaar SIM Card : तुमच्या आधारवरून दुसरं कोणी सिम वापरत नाही ना? फक्त एकाच क्लिकवर जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar SIM Card : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनेत सतत वाढ होत आहे. यामध्ये सिम कार्डचा वापर करून देखील मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात येत आहे. आधार कार्ड वापरून नवीन सिम कार्ड घेतले जाते. परंतु, अनेकांना याची कसलीच कल्पना नसते.

अनेकवेळा तुमच्या आधार कार्डचा वापर करून दुसरे कोणीही नवीन सिम कार्ड खरेदी करतात. या सिमचा वापर चुकीच्या कामासाठी देखील करण्यात येतो. अशा स्थितीमध्ये तुमच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता असते. त्यामुळे तुमच्या आधार कार्डवर किती मोबाइल नंबर जारी केले आहेत ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा दुरुपयोग करणारा दुसरा कोणी आहे का किंवा तुमच्या नावावर असणारे सिमकार्ड घेऊन तुमच्या आधार सिमकार्डचा गैरवापर तर केला जात नाही ना हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. काळजी करू नका, हे शोधणे खूप अवघड काम नाही. आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारे सहज जाणून घेता येईल.

फॉलो करा या महत्त्वाच्या स्टेप्स

  • सर्वात अगोदर तुम्हाला https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/ वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • ही वेबसाइट सुरु केली तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या बॉक्समध्ये तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक टाकावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड येईल, तो या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुम्हाला ‘लॉग इन’ वर क्लिक करावे लागणार आहे.
  • या ठिकाणी तुम्ही लॉग इन करताच, तुमच्या आधार कार्ड वरून घेण्यात आलेल्या सर्व फोन नंबरची यादी तुमच्या स्क्रीनसमोर पाहायला मिळेल.
  • तुमच्यासमोर आलेल्या लिस्टमध्ये तुमचे नंबर कोणी घेतले आहेत की नाही ते पाहता येईल.
  • अशा प्रकारे तुम्हाला ते चुकीचे नंबर लगेचच ब्लॉक करता येतील. इतकेच नाही तर तुम्हाला त्यासाठी ऑनलाइन तक्रार दाखल करता येईल.