Categories: आर्थिक

अबब! ‘ह्या’ शेतकऱ्याला सापडलेला दगड निघाला हिरा ; रातोरात झाला लक्षाधीश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-प्रत्येकजण श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो, परंतु श्रीमंत होण्याचे प्रत्येकाच्या नशिबात नसते. बरेच लोक रात्रंदिवस कष्ट करूनही त्यांच्या गरजा भागविण्यास असमर्थ असतात.

परंतु काही लोकांचे भाग्य इतके मजबूत असते की त्यांना कोणत्याही प्रयत्नाशिवाय सर्वकाही मिळते. काही लोक नशिबामुळे रात्रीतून श्रीमंत होतात.

असेच काहीसे घडले आहे मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याबद्दल. या शेतकऱ्याला जमीन खोदताना एक हिरा सापडला, त्या बदल्यात त्याला आता 60 लाख रुपये मिळाले आहेत. चला या शेतकर्‍याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.

एका रात्रीत श्रीमंत झाला :- टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील लखन यादव या शेतकऱ्याला जमिनीत खोदताना एक ‘हिरा’ सापडला. सुरुवातीला यादव याना तो दगड वाटला. पण नंतर कळले की हा 14.98 कॅरेटचा हिरा आहे. शनिवारी या हिऱ्याचा लिलाव 60.6 लाख रुपयांना झाला. यादव ज्या जागेवर खोदत होते, तो फक्त 10X10 चा जमिनीचा तुकडा होता, जो त्याने फक्त 200 रुपयात भाड्याने घेतला होता.

हिरा कधी आणि कुठे मिळाला? :- यादव यांना दिवाळीच्या आसपास हा हिरा मिळाला होता, ज्याचा आता लिलाव झाला आहे. हा हिरा त्याला मध्य प्रदेशातील पन्ना येथे सापडला जो हिराच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. यादव यांनी या घटनेचे जीवन बदलवणारी घटना असल्याचे वर्णन केले आहे.

पैशाने काय करणार ? :- या पैशांचे काय करणार या प्रश्नाचे उत्तर देताना यादव असे म्हणतात की ते काही मोठे करणार नाहीत. ते सुशिक्षित नाहीत. त्यांच्या मुलांचे चांगले शिक्षण व्हावे यासाठी ते त्यांचे पैसे एफडीमध्ये ठेवतील. त्याच्याकडे दोन म्हशी , थोडीशी जमीन आहे. आणि आता मोटारसायकल घेतली आहे. ही मोटारसायकल त्यांनी हा हिरा जिल्हा प्रशासकात जमा केल्यावर मिळालेल्या पहिल्या एक लाख रुपयात विकत घेतली आहे. मोटारसायकल खरेदी केल्यावर ते म्हणतात की त्याने ते आपल्या पुतण्यांच्या सांगण्यावरून विकत घेतली नाहीतर आपल्या सायकलवरू ते आनंदी होते.

 ‘पन्ना’ हे गाव आहे डायमंड सिटी:-  मध्य प्रदेशच्या पन्नाला डायमंड सिटी म्हणतात. लोक म्हणतात की इथले शेतकरी कधीही श्रीमंत होतात. इथे सापडणारे हिरे हे त्याचे कारण आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24