Bank loans : भारत कृषी प्रधान देश आहे. बहुतांश लोक शेती करतात. अलीकडील काळात शेतीचे यांत्रिकीकरण झाले. त्यामुळे आता शेतात बहुसंख्य लोक ट्रॅक्टर वापरतात. विविध यंत्रे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात वापरली जातात.
परंतु सर्वच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे शक्य होत नाही. कारण याची किंमत साधारण २० लाखापर्यंत जाते.त्यामुळे अनेकदा शेतकरी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी करतो. तुम्हीही जर ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज घेणार असाल
तर आधी तुम्ही विविध बँकांचे व्याजदर तपासा. येथे विविध बँकांच्या ट्रॅक्टर कर्जाच्या व्याजदरांची माहिती दिली आहे. तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल.
* स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज देते. या कर्जाचा दर 9.85 टक्के आहे. बँक 2 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रॅक्टर कर्जावर कोणतेही शुल्क आकारत नाही. SBI कर्जाच्या रकमेच्या 1.40% + GST आकारेल.
हे बँक साधारण २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. तुम्हाला ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्याचंचच असेल तर मग स्टेट बँकेचे कर्ज तुम्हाला परवडू शकते.
* ICICI बँक
ICICI बँक देखील ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज देते. या कर्जाचे व्याजदर १२ ते २२.२ टक्के पर्यंत आहेत. यामध्ये सरकारी अनुदानाचा समावेश असल्याचे समजते. परंतु इतर सरकारी योजनांचा समावेश नाही. जर तुम्हाला ICICI बँकेकडून हे लोन हवे असेल तर तुमच्याकडे किमान ३ एकर जमीन असावी असे म्हटले आहे.
* एचडीएफसी बँक
HDFC ही देशातील नामंकित बँक आहे. या बँकेत ट्रॅक्टर कर्जाचा दर कमी आहे. या बँकेत साधारण 8.98 टक्के कर्जाचा दर आहे. परंतु येथे एक लक्षात घ्या की, जर ईएमआय भरण्यास उशीर झाला तर तुमच्यावर दरमहा 1.5 टक्के अधिक कर लागेल.
त्यामुळे दर जरी कमी असला तरी तुम्हाला ईएमआयवेळेवर जाईल याची काळजी घ्यावी लागेल ती वेगळीच.
* इतर काही बँकांची व्याजदरे
इतर काही बँकांची व्याजदरे देखील येथे आपण पाहुयात. यात ऍक्सेस बँकेचे कर्ज पाहिले तर ही बँक नवीन ट्रॅक्टरसाठी 17.5 टक्के ते 20 टक्के दराने कर्ज देते. येस बँकेचे रेट देखील याच दरम्यान आहेत. ही बँक नवीन ट्रॅक्टरसाठी 2.2 टक्के ते 17 टक्के दराने कर्ज देते.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत ट्रॅक्टरसाठी कर्जाचा दर 10.05 ते 11.70 टक्के आहे. तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षे ते 9 वर्षे कालावधी याठिकाणी दिला जातो.
* लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी
प्रत्येक बँकेत कर्जाचे दर वेगवेगळे आहेत. कर्ज भरण्याचा कालावधी देखील भिन्न असतो. तसेच जर तुम्हा ईएमआय हुकला तर मात्र तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो हे देखील लक्षात घ्या.