आर्थिक

SBI , HDFC नंतर आता ‘या’ सर्वात मोठ्या बँकेने दिला झटका; सर्व कर्ज महागणार, EMI वाढणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

देशातील बँक आता आपला व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे कर्जधारकांना मोठा झटका बसत आहे. या दरवाढीमुळे त्यांचे EMI वाढत चालले आहेत. नुकतेच HDFC बँकेने देखील आपल्या व्याजदरात वाढ केली होती. याचा ग्राहकांना झटका बसला.

आता त्या पाठोपाठ आणखी एका बँकेने देखील आपले व्याज दर वाढवले आहेत. आता कॅनरा बँकेने त्यांच्या एमसीएलआर दरात ५ बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यामुळे आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांचाही EMI वाढणार आहे.

दर वाढवल्याने की किती फरक पडणार? किती दरवाढ होऊ शकते ?

बँकेने MCLR रेट वाढवल्याची घोषणा केली असली तरी देखील ही दरवाढ १२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी सध्या एमसीएलआर दर ८.७० टक्के आहे,

जो आता १२ तारखेपासून ८.७५ टक्के होणार आहे. हे दर १ वर्षासाठी आहेत. आता हे दर वाढल्याने ग्राहकांना कारलोन पासून ते होम लोन पर्यंत सर्व काही महाग होणार आहे.

HDFC बँकेची काय आहे परिस्थिती ?

HDFC बँकेने दोन दिवसांपूर्वी आपल्या एमसीएलआर दरात ५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती. हे दर ७ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात कोणताही बदल केलेलं नाहीत. असे असले तरी बँक आपल्या व्याजदरात वाढ करत आहेत.

RBI घेऊ शकते महत्वाचा निर्णय

RBI आता काहीतरी महत्वाचा निर्णय घेऊ शकते असा अंदाज आहे. सध्या वाढती महागाई, घसरलेला रुपया आदी कारणामुळे पुढील बैठकीत RBI रेपो दरात वाढ करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आरबीआयकडून याबाबत तसे संकेतही देण्यात आलेत. परंतु सध्या कोणतेही वाढ केले नसेल तरी बँक मात्र आपल्या व्याजदरात वाढ करण्याचे निर्णय घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24