आर्थिक

एअरटेल ग्राहकांना मोठा फायदा! कंपनीने ‘या’ रिचार्ज प्लानच्या किमती केल्या कमी

Published by
Ratnakar Ashok Patil

Airtel Recharge Plan:- एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन महत्त्वाच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत लक्षणीय कपात केली असून ग्राहकांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कंपनीने ४९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ३० रुपयांनी कमी करून ४६९ रुपये केली आहे, तर १९५९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ११० रुपयांनी कमी करून १८४९ रुपये केली आहे. या बदलांमुळे ग्राहकांना अधिक किफायतशीर दरात सेवा मिळणार आहेत व मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे.

४६९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० मोफत एसएमएसचा समावेश आहे. मात्र या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाचा समावेश नाही. ज्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसची गरज आहे.त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.

१८४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या वार्षिक प्लॅनमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० मोफत एसएमएसचा समावेश आहे. या प्लॅनमध्येही इंटरनेट डेटाचा समावेश नाही. ज्यांना दीर्घकालीन कॉलिंग आणि एसएमएसची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

एअरटेलच्या या निर्णयाचे महत्त्व

एअरटेलने या प्लॅनच्या किंमतीत कपात करून ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य दिले आहे. विशेषतः, ज्यांना इंटरनेट डेटाची आवश्यकता नाही अशा ग्राहकांकरिता हे प्लॅन किफायतशीर पर्याय ठरतील. कंपनीच्या या पावलामुळे ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या गरजांनुसार प्लॅन निवडण्याची सुविधा मिळेल.

एअरटेलच्या या बदलांमुळे ग्राहकांना

अधिक लवचिकता आणि किफायतशीर सेवा मिळणार आहेत. कंपनीने ग्राहकांच्या मतानुसार हे निर्णय घेतले असल्याचे दिसते व यामुळे एअरटेल ग्राहकांना फायदा होणार आहे.

Ratnakar Ashok Patil