अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- तुम्ही देखील LIC पॉलिसी खरेदी केली आहे किंवा पॉलिसी घेण्याचा विचार करत आहात का? अशावेळी तुम्हाला जर या पॉलिसीबाबत चुकीची माहिती देणारे फोन येत असतील वेळीच सावध व्हा. LIC ने ट्विटरवरून ग्राहकांना अशा फोन कॉल्सपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.
हे भामटे पॉलिसी बाबत चुकीची माहिती देत फसवणूक करतात. शिवाय ते LIC चे अधिकारी असल्याचं भासवत असल्याने अनेकदा ग्राहक देखील त्यांच्या बोलण्याला फसतात. पॉलिसीची रक्कम त्वरित देण्याचं सांगत अनेकांती फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या गोष्टी जरूर लक्षात ठेवा जर तुम्हाला पॉलिसीबाबत कोणतीही माहिती हवी असेल तर www.licindia.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊनच माहिती मिळवा. कोणत्याही क्रमांकावर फोन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.
शिवाय तुम्हाला एखादा फसवा फोन कॉल आलाच तर जवळच्या पोलीस ठाण्यात कॉल करा. spuriouscalls@licindia.com या लिंकवर क्लिक करून तुम्ही रिपोर्ट देखील पाठवू शकता. अशाप्रकारे फोन कॉल आल्यास त्यावर दीर्घकाळ बातचीत करू नका तसंच कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
या फोन कॉलवर पॉलिसी सरेंडरविषयीही माहिती देऊ नका. पॉलिसी डिटेल्स देखील अशा प्रकारे कोणत्याही फोन कॉलवर शेअर करू नका. ही माहिती मिळवण्यासाठी एलआयसी ग्राहकांना फोन करत नाही हे लक्षात घ्या.