आर्थिक

State Bank of India : एसबीआयच्या ग्राहकांसाठी अलर्ट..! असे केल्यास खाते होऊ शकते रिकामे…

Published by
Ahmednagarlive24 Office

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या ग्राहकांना खाते बंद झाल्याचा बनावट संदेश मिळत आहे. या संदर्भात, ग्राहकांना सावध करण्यात आले आहे की त्यांनी त्या बनावट संदेशांना उत्तर देऊ नये.

हा मेसेज खोटा आहे आणि त्याला रिप्लाय देणारे आणि स्वतःची वैयक्तिक माहिती देणारे ग्राहक फसवणुकीला बळी पडू शकतात. ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये काय लिहिले जाणून घेऊया…

SBI ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, प्रिय SBI वापरकर्त्यांनो, आज तुमचे YONO खाते ब्लॉक केले जाईल. तुमचा पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यासाठी कृपया लिंकवर क्लिक करा.

ग्राहकांनी अशा कोणत्याही ईमेल/एसएमएसला प्रतिसाद देऊ नका असा इशारा देण्यात आला आहे. तुम्हाला असा कोणताही संदेश मिळाल्यास, ‘report.phishing@sbi.co.in‘ वर त्वरित कळवा.

SBI च्या वेबसाइटनुसार, खाते क्रमांक, पासवर्ड किंवा संवेदनशील माहितीसह कोणतेही वैयक्तिक तपशील संदेशांद्वारे उघड करू नका, कारण त्याचा वापर फसवणुकीसाठी केला जाऊ शकतो. असे सांगण्यात आले आहे.

एसबीआय ग्राहकांना इशारा

एसबीआय खातेधारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याची, खाते सक्रिय करण्याची किंवा फोन नंबरवर कॉल करून किंवा वेबसाइटवर माहिती देऊन त्यांची ओळख सत्यापित करण्याची तातडीची गरज व्यक्त करणारा मजकूर संदेश प्राप्त झाल्यास सावधगिरी बाळगा. हे संदेश फिशिंग स्कॅमचा भाग असू शकतात. तुमच्या खात्याची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी हे फसवणूक करणाऱ्यांकडून केले जात आहे.

फेक मेसेज आल्यावर कुठे तक्रार करायची?

कोणत्याही सायबर घटनेची तक्रार करण्यासाठी, ग्राहक report.phishing@sbi.co.in वर ईमेल पाठवू शकतात. बँकेने सांगितले की तुम्ही सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही https://cybercrime.gov.in/ ला भेट देऊ शकता.

Ahmednagarlive24 Office