अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- Amazon आपला फ्यूचर इंजिनियर प्रोग्राम भारतात सुरू करणार आहे. यात जॉब पोस्टिंग टिप्सचा समावेश असेल. मागील वर्षी कंपनीने हा कार्यक्रम अमेरिकेतून सुरू केला होता.
कम्प्यूटर साइंस क्लासच्या मदतीने कोडिंग आणि संगणकांबद्दल विद्यार्थ्यांना शिकविणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. कंपनी सध्या अॅमेझॉन फ्यूचर इंजिनियर प्रोग्रामचे नेतृत्व करण्यासाठी मॅनेजरला हायर करत आहे.
Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी यावर्षी जानेवारीत सांगितले की, भारतातील लघु व मध्यम व्यवसायांना डिजीटल करण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स (7,000 कोटींपेक्षा जास्त) गुंतवणूक करणार आहे. एकविसाव्या शतकातील भारत-अमेरिका युती सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.
बेंगळुरू येथे मुख्यालय असेल :- टेकक्रंचच्या अहवालानुसार, Amazon ची योजना 2021 मध्ये भारतात फ्यूचर इंजिनियर सुरू करण्याची योजना आहे. भारतात अॅमेझॉन फ्यूचर इंजिनियरसाठी संशोधन चालू आहे. यासाठी उमेदवारांची निवड केली जात आहे. ते भारत संबंधित विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी आमच्या प्रोग्रामवर लक्ष ठेवतील. यासाठी कंपनीचे मुख्यालय बंगळुरूमध्ये असेल. Amazon ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, यूएस मधील 5,000 पेक्षा जास्त शाळा आणि 550,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फ्यूचर इंजीनियर प्रोग्राम विस्तारित होईल.
100 विद्यार्थ्यांना 7.32 लाखांची शिष्यवृत्ती मिळेल :- Amazon फ्यूचर इंजिनियर प्रोग्रामचे उद्दीष्ट हे असे आहे की अशा विद्यार्थ्यांचह विकास करणे कि जे अंडर प्रजेंटेड व अंडर सर्व्ड असतील. यासाठी 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी 10,000 डॉलरची (सुमारे 732,000 रुपये) शिष्यवृत्ती दिली जाईल. Amazon ने यापूर्वीच देशात 6.5 बिलियन डॉलर (सुमारे, 47,586 कोटी रुपये) गुंतवण्याचे वचन दिले आहे. त्यापैकी यंदा 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली. अॅमेझॉनने 2025 पर्यंत देशात लाखो रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतही बोलले आहे.
गूगल आणि मायक्रोसॉफ्टसुद्धा याच मार्गावर आहेत :- Amazon माणेच गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही बऱ्याच काळापासून भारतीय विद्यार्थ्यांमध्ये रस दाखवत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस एज्युटेक स्टार्टअप अनएकेडमीमध्ये फेसबुकने गुंतवणूक केली. त्याचबरोबर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सेफ्टी आणि आग्युमेंटेड रियलिटी प्लॅटफॉर्मदेखील दिला आहे.