आर्थिक

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेतील फक्त 200 रुपयाची गुंतवणूक तुम्हाला बनवणार लखपती ! कस ते पहा….

Published by
Ahmednagarlive24 Office

Post Office RD Scheme : आपल्यापैकी अनेकजण कष्टाने कमावलेल्या पैसा दुप्पट व्हावा यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असतील. जर तुमचाही असाच विचार असेल आणि तुम्हालाही कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे.

खरे तर, गुंतवणुकीसाठी अलीकडे वेगवेगळे ऑप्शन्स गुंतवणूकदारांपुढे आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. येथील गुंतवणूक ही काहीशी रीस्की असते यामुळे अनेकजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत नाहीत.

अनेकांना सुरक्षित गुंतवणूक करायची असते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना, आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना असे नानाविध पर्याय गुंतवणूकदारांपुढे आहेत. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेबाबत सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोस्ट ऑफिसची आरडी योजना

पोस्ट ऑफिसची आरडी योजना ही गुंतवणूकदारांसाठी एक फायदेशीर योजना ठरु शकते. या योजनेत जर गुंतवणूकदारांनी 5 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना चांगले व्याजदर मिळते. पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना 6.7% एवढे व्याजदर मिळते.

विशेष म्हणजे त्रैमासिक चक्रवाढ व्याजेचा देखील यामध्ये फायदा मिळतो. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथे तुम्हाला एकमुस्त रक्कम गुंतवावी लागत नाही. येथे तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या आरडी स्कीम मध्ये तुम्ही दर महिन्याला किमान शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात.

विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा ठरवलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराला जेवढी अमाऊंट गुंतवायचे असेल तेवढी तो गुंतवू शकतो. पोस्ट ऑफिसची ही योजना पाच वर्षात मॅच्युअर होते. यानंतर पुन्हा गुंतवणूकदार एक अर्ज भरून ही योजना पुढे एक्सटेंड करू शकतो.

गुंतवणूकदार या एक्सटेंड केलेल्या कालावधीत पैसे भरू शकतो. जर गुंतवणूकदाराने या एक्सटेंड केलेल्या कालावधीत पैसे भरले नाही तरी त्याला आधीच गुंतवणलेल्या रकमेवर व्याजेचा फायदा मिळत राहणार आहे.

200 रुपये गुंतवणूक केल्यास 5 वर्षांनी मिळणार मोठा फंड

जर तुम्ही दररोज दोनशे रुपयांची बचत केली म्हणजेच महिन्याला ₹6000 रुपयांची बचत केली आणि हा पैसा पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवला तर तुम्हाला या योजनेतून चांगला परतावा मिळणार आहे. जर तुम्ही 6000 रुपये प्रति महिना याप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक केली तर पाच वर्षात चार लाख 28 हजार 197 रुपयांचा फंड तयार होणार आहे.

यात 68 हजार 197 रुपये तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात रिटर्न म्हणून मिळणार आहेत. पण जर तुम्ही ही योजना पुन्हा पाच वर्षांसाठी एक्सटेंड केली आणि या कालावधीत पुन्हा सहा हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे गुंतवणूक केली तर हा फंड आणखी मोठा होणार आहे.

दरमहा सात हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास या योजनेत दहा वर्षानंतर दहा लाख 25 हजार 191 रुपयांचा मोठा खंड तयार होणार आहे. यामध्ये तीन लाख पाच हजार 191 रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहेत.

Ahmednagarlive24 Office