आर्थिक

वृद्धापकाळात आरामदायी जीवन जगण्यासाठी आजच ‘या’ तीन सरकारी पेन्शन योजनांचा लाभ घ्या, वाचा सविस्तर माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

प्रत्येकाचे तरुणपण हे व्यवस्थित व्यतीत होते. कारण या वयात काम करण्याची उमेद असते. पैसे मिळत राहतात. परंतु खरा प्रश्न आहे निवृत्तीनंतरचा. म्हणजे म्हतारपणामधील.म्हातारपणी उत्पन्नाचे साधन नसेल तर जगणे ओझे बनते. इतरांकडे पैसे मागावे लागतात.

पण असे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत नाही. जे तरुणपणी सावध असतात आणि पेन्शन योजनेत वेळेवर काही गुंतवणूक करतात, त्यांचे वृद्धापकाळ आनंदी जाते. कारण त्यांना दरमहा पेन्शन म्हणून एक रक्कम मिळते.

त्यामुळे आज आम्ही अशाच काही सरकारी योजनांबद्दल बोलणार आहोत, ज्यात गुंतवणूक केल्यानंतर वृद्धापकाळात पेन्शनच्या स्वरूपात बंपर परतावा मिळेल.केंद्र सरकार सध्या वृद्धांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवत आहे. या प्लॅन्समध्ये अत्यंत कमी प्रीमियम भरून तुम्ही मासिक पेन्शनसाठी पात्र ठरू शकता.

विशेष म्हणजे सरकारच्या या योजनांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्यात आली आहे. आता जर तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर म्हातारपणी तुम्हाला दरमहा चांगली पेन्शन मिळेल. चला आज जाणून घेऊया केंद्र सरकारच्या या योजनांबद्दल.

अटल पेन्शन योजना : केंद्रातील मोदी सरकारकडून सध्या अटल पेन्शन योजना राबवली जात आहे. 18 ते 40 वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षे झाल्यानंतर या पेन्शन योजनेत 1000 ते 5000 रुपये मासिक पेन्शन दिली जाईल. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 210 रुपये मासिक प्रीमियम आणि जास्तीत जास्त 1,454 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल.

प्रधानमंत्री वय वंदना योजना : प्रधानमंत्री वय वंदना योजनाही केंद्र सरकारकडून चालविली जात आहे, ही एक उत्कृष्ट योजना आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकही पेन्शनचा पर्याय निवडू शकतात.

यात इतर पेन्शन योजनांच्या तुलनेत चांगले व्याजदर दिले जातात. या योजनेअंतर्गत वार्षिक पर्याय निवडल्यास 10 वर्षांसाठी 8.3 टक्के दराने व्याज मिळेल. विशेष म्हणजे यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा साडेसात लाखांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजना : ही योजना व्यापारी, दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी आहे. विशेष म्हणजे जीएसटीअंतर्गत नोंदणी कृत आणि दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेले व्यापारी किंवा दुकानदारच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील लोक घेऊ शकतात. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. मात्र, त्यासाठी 55 ते 200 रुपये दरम्यान प्रीमियम भरावा लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office