आर्थिक

Business Idea : जबरदस्त व्यवसाय ! ‘हा’ बिझनेस थंडी व लग्नसराईत कमावून देईल लाखो रुपये

Published by
Ahmednagarlive24 Office

जीवनातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैसे कमी पडतायेत? मग त्यासाठी पैसे कमवायचा नवीन मार्ग शोधतायेत? तर मग तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया या ठिकाणी घेऊन आलो आहोत. हा बिझनेस आहे ड्रायफ्रूट्सचा बिझनेस. त्यातच आता थन्डी सुरु झालीये, त्यामुळे सध्या मार्केटमध्ये याची डिमांड प्रचंड वाढली आहे. त्यामुळे हा बिझनेस सुरु करण्यासाठी हे दिवस अत्यंत चांगले आहे. या ड्रायफ्रुट्सच्या माध्यमातून तुम्ही मोठा नफा कमवू शकता. चला या बिझनेस विषयी जाणून घेऊयात 

जास्त पैसे न गुंतवता तुम्ही जास्त इन्कम या बिझनेस मधून मिळवू शकता. यासाठी थोडे डोके तुम्हाला वापरावे लागेल. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. बिझनेस कोणताही असो, जिद्द, चिकाटी, मेहनत यांच्या जोरावर तुम्ही अमाप पैसा कमावू शकता.

बिझनेसची सुरवात करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स कमी किमतीत मिळेल असे ठिकाण शोधावे लागेल. यासाठी तुम्हाला होलसेस बाजारपेठ शोधावी लागेल. येथे तुम्हाला कमी किमतीत ड्रायफ्रूट्स मिळतील. तुम्ही ते जास्त दरात विकू शकता. असे केल्याने तुम्ही कमी वेळात भरपूर पैसे कमवू शकता. तुम्ही बाजारात असणाऱ्या किमतीपेक्षा थोडे कमी किमतीत हे विका, यात थोडे मार्जिन कमी निघेल पण बिझनेस प्रचंड वाढेल.

योग्य लोकेशन

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी लोकेशन खूप महत्त्वाचे असते. तुम्ही गर्दीच्या, बाजारपेठेच्या ठिकाणी हा व्यवसाय सुरु करण्यासाठी दुकान उघडा. या दुकानाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय प्रचंड वाढू शकतो.
किंवा तुम्ही लोकांपर्यंत जाऊन थेट पुरवठाही करू शकता.

पुरवठ्यासाठी तुम्हाला वाहतूक खर्च लागेल. पण जर तुम्ही तुमचे दुकान चांगल्या मार्केटमध्ये उघडले असेल, तर ड्रायफ्रूट पुरवठ्याचा वाहतूक खर्च वाचेल. त्यामुळे योग्य लोकेशनवर जर तुम्ही दुकान उघडले तर तुमचा प्रचंड फायदा होईल.

भांडवल व इन्कम

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला साधारण १ लाख रुपयांपर्यंत पैसे लागतील. हे पैसे तुम्हाला माल खरेदी करण्यासाठी लागतील. यातून तुम्ही छोट्या स्तरावरून बिझनेस सुरु करू शकता. तुम्ही हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करू शकता आणि जसजसा नफा वाढेल तसतसा तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. यात तुम्ही ५ ते १० लाख रुपये गुंतवून थेट मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरु करू शकता.

यातुन नफा देखील जास्त मिळू शकतो. ड्रायफ्रूटच्या व्यवसायात 20 ते 30 टक्के नफा मिळवू शकता. म्हणजेच जर तुम्ही 1 लाख रुपयांचा ड्रायफ्रुटसचा बिझनेस केला तर तुम्ही साधारण 20 ते 30 हजार रुपये रुपये नफा मिळवू शकता. तुमचा पुरवठा जितका वाढेल तितका नफा वाढेल. जर तुम्ही तुमचा व्यवसाय 10 लाखांपर्यंत नेला तर तुम्ही साधारण 3 लाखांपर्यंत नफा कमाऊ शकता.

Ahmednagarlive24 Office