Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! एक हजाराच्या गुंतवणूकीवर मिळतील 8 लाख

Content Team
Published:
Post Office

Post Office : सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी पोस्टाच्या योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पोस्टाकडून अनेक बचत योजना ऑफर केल्या जातात, यामध्ये अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत बचत योजना आहेत. या योजनांमध्ये तुम्हाला खात्रीशीर परताव्याच्या हमी मिळते.

अशातच तुम्ही सध्या पोस्टाची उत्तम योजना शोधत असाल तर पोस्टाच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची निवड करू शकता. पीपीएफ ही सरकारी हमी योजना आहे. या योजनेत तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करून उत्तम परतावा कमवू शकता.

ही योजना 15 वर्षांची आहे. जरी तुम्हाला या योजेनचा आणखी फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचे खाते आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. पीपीएफमध्ये 500 ते 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केले जाऊ शकतात. सध्या त्यावर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. ईईई श्रेणीच्या या योजनेत तीन प्रकारे व्याजही वाचवता येते.

यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेत खाते उघडू शकता. तुम्ही या योजनेत दरमहा फक्त 1,000 गुंतवल्यास, तुम्ही काही वर्षांमध्ये 8 लाखांपेक्षा जास्त फंड जोडू शकता.

तुम्ही या योजनेत दरमहा 1,000 गुंतवल्यास, तुम्ही एका वर्षात 12,000 गुंतवाल. ही योजना 15 वर्षांनी परिपक्व होईल, परंतु तुम्हाला ती प्रत्येकी 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा वाढवावी लागेल आणि 25 वर्षे सतत गुंतवणूक करणे सुरू ठेवावे लागेल.

तुम्ही 25 वर्षांसाठी दर महिन्याला 1,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही एकूण 3,00,000 रुपये गुंतवाल. आणि 7.1 टक्के व्याजानुसार, तुम्ही व्याजातून फक्त 5,24,641 रुपये कमवाल आणि तुमची मॅच्युरिटी रक्कम 8,24,641 रुपये होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe