पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! दररोज 333 रुपयांची गुंतवणूक बनवणार तुम्हाला 17 लाखाचे धनी; पहा कोणती आहे ही योजना ?

Ahmednagarlive24 office
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अलीकडे, एफडीच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अनेकांनी एफडी मध्ये गुंतवणूक केली आहे.

मात्र असे असले तरी आजही पोस्टाच्या काही योजना या एफडीपेक्षा अधिकचे व्याज देत आहेत. यामुळे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि अधिकचा परतावा मिळावा यासाठी पोस्टाच्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवत आहेत.

दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका जबरदस्त योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या एखाद्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरू शकते.

आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदार फक्त 333 रुपयांची गुंतवणूक करून 17 लाख रुपयांचे धनी होऊ शकणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या लखपती बनवणाऱ्या योजनेविषयी सविस्तर माहिती.

कोणती आहे ही योजना?

खरंतर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक स्मॉल सेविंग स्कीम चालवल्या जात आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या रेकरिंग डिपॉझिट स्कीमचा म्हणजे आरडी योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेत मंथली किमान शंभर रुपयांची गुंतवणूक करावी लागते. मंथली शंभर रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही या योजनेत अकाउंट ओपन करू शकता.

यामध्ये देखील तुम्हाला सिंगल आणि जॉईंट अकाउंट ओपन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 6.7% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो.

मात्र या योजनेत तुम्हाला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही दरमहा गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला दंड द्यावा लागू शकतो. जर समजा तुम्ही चार महिने या योजनेत गुंतवणूक केली नाही तर या योजनेचे खाते बंद देखील केले जाऊ शकते.

आरडी योजनेचा मॅच्युरिटी पिरेड हा पाच वर्षाचा आहे. म्हणजे ही योजना पाच वर्षांसाठी असते. जर समजा तुम्ही या योजनेत दररोज 333 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे मंथली दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर अर्थातच पाच वर्षांनी तुम्हाला सात लाख 13 हजार 659 रुपये मिळणार आहेत.

या कालावधीत तुमची गुंतवणूक सहा लाख रुपयांची राहणार आहे आणि एक लाख 13 हजार 659 तुम्हाला व्याज मिळणार आहे. दरम्यान जर तुम्हाला या योजनेतून 17 लाख रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर आणखी पाच वर्षांसाठी ही गुंतवणूक एक्सटेंड करावी लागणार आहे.

म्हणजे तुम्हाला दहा वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करायचे आहे. दहा वर्ष तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दरमहा दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला एकूण 17 लाख 8,546 रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमची गुंतवणूक 12 लाख रुपयांची राहणार आहे आणि तुम्हाला पाच लाख 8 हजार 546 रुपये व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe