Tax Savings Tips: येत्या काही दिवसातच भारताचा नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. यामुळे तुम्ही देखील अद्याप तुमचे कर नियोजन केले नसेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठा फायदा होणार आणि तुम्हाला 2 लाख रुपयांची कर सूट देखील मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या प्रकारे तुमचे 2 लाख रुपये वाचू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टम आहे, जी सरकारद्वारे चालवली जाणारी पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार टियर 1 आणि टियर 2 अशी दोन प्रकारची खाती उघडू शकतात. त्यात जमा होणारा पैसा सरकारी रोखे, इक्विटी मार्केट आणि डेटमध्ये गुंतवला जातो. टियर 1 हे पेन्शन खाते आहे आणि टियर 2 हे गुंतवणूक खाते आहे.
NPS चे फायदे
NPS चे अनेक फायदे आहेत. यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे सेवानिवृत्तीसोबतच कर वाचवणे. कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना अतिरिक्त फायदे दिले जातात.
कर लाभ
एका आर्थिक वर्षात NPS मध्ये 2 लाख रुपयांचे योगदान करमुक्त आहे. आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची वजावट दिली जाते. याशिवाय, NPS च्या टियर 1 खात्यात योगदानावर 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त वजावट दिली जाते. अशा प्रकारे, NPS मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही दोन लाखांपर्यंतच्या सूटचा लाभ घेऊ शकता.
कॉर्पोरेट क्षेत्रासाठी कर लाभ
कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचार्यांना एनपीएसमध्ये योगदान देण्यासाठी अतिरिक्त फायदे दिले जातात. कर्मचार्यासाठी NPS मध्ये नियोक्त्याने केलेले योगदान कोणत्याही आर्थिक मर्यादेशिवाय करपात्र उत्पन्नातून वजा केले जाते. तथापि, ते पगाराच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
NPS खाते कोण उघडू शकते
18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकतो. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन ते उघडू शकता.
हे पण वाचा :- iPhone 14 Offers : होणार महाबचत ! फक्त 47 हजारात घरी आणा 80 हजारांचा आयफोन 14 ; कसे ते जाणून घ्या