Axis Bank : अ‍ॅक्सिस बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट जारी, वाचा सविस्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Axis Bank : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांना इशारा दिला आहे. फसवणूकीच्या तक्रारी वाढल्या असून, बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे, बँकेने ट्विट करत ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांना स्वतःबद्दलची खाजगी माहिती कुणालाही देण्यास मनाई केली आहे, असे केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, असा इशारा देखील बँकेने दिला आहे.

ऑनलाइन बँकिंगचा ट्रेंड वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. वेगवेगळे नियम सांगून लोकांची फसवणूक केली जात आहे. आपली कोणतीही गोपनीय माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नये यासाठी बँकाही ग्राहकांना सतत जागरूक करत असतात. त्याचबरोबर सायबर क्राईम तज्ज्ञ नवीन मार्गाने लोकांना अडकवत आहेत. अलीकडेच, स्क्रीन शेअरद्वारे फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत आणि आता Axis Bank ने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

बँकेने सांगितले आहे की, ‘आजकाल अनेक लोक ‘एनी डेस्क’च्या माध्यमातून फसत आहेत, ज्याद्वारे तुमच्या डिव्हाइसची स्क्रीन इतर कोणाशी तरी शेअर केली जाते. अशा परिस्थितीत ‘एनी डेस्क’च्या नावाखाली लोकांना कशा प्रकारे फसवलं जातं, हे बँकेनं सांगितलं आहे. जाणून घ्या आता लोक कसे अडकले आहेत…

अ‍ॅक्सिस बँकेचा इशारा :-

अ‍ॅक्सिस बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, ते ग्राहकांना त्यांच्या फोनवर प्रवेश मिळवण्यासाठी विविध मार्गांनी फसवतात आणि नंतर बनावट व्यवहार करतात. यासाठी लोकांना अशा प्रकारे फसवले जात आहे.

-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फसवणूक करणारे तुम्हाला कॉल करू शकतात.

-तुम्हाला AnyDesk किंवा Team Viewer सारखे डेस्कटॉप ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते.

-किंवा तुम्हाला एक लिंक उघडण्यास सांगितले जाईल.

-तुम्हाला 9 अंकी कोड शेअर करण्यास सांगितले जाते, ज्याद्वारे फसवणूक करणारे तुमच्या डिव्हाइसवर प्रवेश मिळवतात.

यासह, ते तुमच्या डिव्हाइससह काहीही करू शकतात आणि तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकतात. तसेच, डिव्हाइस शेअर केल्यानंतर, त्यांना डिव्हाइस पिन, पॅटर्न, एमपीआयएन यासारख्या अनेक गोपनीय गोष्टी कळतात आणि त्यामुळे तुमच्या खात्यात अनधिकृत व्यवहार होतात.

कसं सावध राहायचं ?

सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका. असे केल्याने तुम्ही तुमचे खाते धोक्यात आणता. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर काही बँका अनेकदा ग्राहकांना चेतावणी देतात. बँकांनी ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले आहे की जर त्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती जसे की खाते क्रमांक, मोबाईल नंबर किंवा वैयक्तिक खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर केली, तर त्यांच्या झालेल्या नुकसानास बँक जबाबदार राहणार नाही. बँका कधीकधी ग्राहकांना ही माहिती हटवण्याची विनंती करतात.