Special Bank Account For Women:- महिलांनी बँकिंग क्षेत्रामध्ये यावे व त्यांना पैशांची बचत करणे सोपे जावे याकरिता ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून महिलांकरिता खास बचत खाते सुरू करण्यात आलेले आहे. हे बचत खाते सुरू करताना महिलांच्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत त्या समोर ठेवून ॲक्सिस बँकेने संपूर्ण तयारी करून या खात्याची सुरुवात केलेली आहे.
एवढेच नाही तर या बचत खात्यामुळे महिलांना अनेक प्रकारच्या सुविधा देखील मिळण्यास मदत होणार आहे. ॲक्सिस बँकेने महिलांसाठी सुरू केलेल्या या बचत खात्याचे नाव आहे ‘अराईज वुमेन सेविंग अकाउंट’ हे होय. अराईस महिला बचत खाते उघडल्यामुळे महिलांना महिला आर्थिक तज्ञाची सुविधा देखील मिळणार आहे.
तसेच या खात्याच्या माध्यमातून महिलांना फॅमिली बँकिंग प्रोग्रामचे फायदे देखील मिळणार आहेत. विशेष म्हणजे या खात्यांतर्गत कुटुंबातील तीन व्यक्ती बँकिंग सुविधा घेऊ शकणार आहेत. तसेच लहान मुलांची खाती देखील कोणत्याही प्राथमिक निधी शिवाय या खात्याला जोडली जाऊ शकणार आहेत.
या खात्याच्या माध्यमातून महिलांना पहिल्या वर्षासाठी मोफत मिळेल लॉकर
या खात्याच्या अंतर्गत महिलांना पहिल्या वर्षी लहान आणि मध्यम लॉकर्सवर शून्य शुल्क लागू होणार आहे. दुसऱ्या वर्षी शुल्का मध्ये 50 टक्क्यांची सवलत असेल. इतकेच नाही तर या अराईस बचत खात्याच्या माध्यमातून मिळालेल्या डेबिट कार्डची व्यवहार मर्यादा देखील जास्त असणार आहे.
उदाहरणच घ्यायचे तर एटीएम वर एक लाख रुपयांची मर्यादा मिळणार आहे. तसेच या कार्डमुळे एअरपोर्ट लाऊंजची सुविधा प्रत्येक तिमाहीत उपलब्ध होणार आहे. इतकेच नाही तर प्रत्येक दोनशे रुपये खर्चासाठी 1 EDGE रिवार्ड देखील मिळणार आहे.
महिलांना मिळेल मोफत NEO क्रेडिट कार्ड
महिलांनी हे खाते उघडल्यावर मोफत एनईओ क्रेडिट कार्ड मिळणार आहे. या कार्डवर महिलांना बुक माय शो वर दहा टक्के ताबडतोब सूट व झोमॅटो ऑर्डरवर 40% पर्यंत सूट मिळणार आहे.
या सगळ्या सुविधांमुळे नक्कीच हे बँक बचत खाते उघडण्यामध्ये महिला आवड दाखवतील असा विश्वास तज्ञांना आहे. सध्याचा जर आपण एकूण खातेदारांमध्ये महिलांचा वाटा बघितला तर तो 36.4% इतका आहे. ॲक्सिस बँकेच्या या महिलांसाठी असलेल्या खास बचत खात्यामुळे महिला खातेदारांमध्ये वाढ होईल अशी एक शक्यता आहे.
महिला तज्ञांकडून मिळेल आर्थिक सल्ला
ॲक्सिस बँकेच्या अराईस वुमेन्स सेविंग अकाउंट उघडून महिलांना एखाद्या महिला तज्ञाकडूनच आर्थिक मार्गदर्शन देखील मिळणार आहे. तसेच महिलांना डिमॅट खात्यावर पहिल्या वर्षाकरिता कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क लागणार नाही.
महिलांना लक्षात घेऊन तयार केलेल्या अशा शेअरच्या बास्केटमध्ये गुंतवणूक करण्याची विशेष सुविधा महिलांना मिळणार आहे. तसेच महिलांशी संबंधित रोग निदान विषयक बाबींवर 70% पर्यंत सूट मिळेल. औषधांवर देखील दहा टक्के सूट मिळेल. अशा पद्धतीने हे बँक खाते महिलांसाठी नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.