आर्थिक

Bajaj Finserv Personal Loan: बजाज फिन्सर्व देईल तुम्हाला 30 मिनिटात 10 लाख रुपये पर्सनल लोन! वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

Bajaj Finserv Personal Loan:- आर्थिक अडचणीच्या कालावधीमध्ये किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्याला अचानकपणे फार मोठ्या रकमेची गरज भासते. अशावेळी मित्र किंवा नातेवाईक इत्यादी कडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो.

तसेच काहीजण बँकांचा देखील आधार घेतात व  यामध्ये पर्सनल लोन घेण्याला जास्त करून प्राधान्य दिले जाते. आजकाल जर आपण पाहिले तर बँकांशिवाय आता अनेक इन्स्टंट पर्सनल लोन देणारे एप्लीकेशन किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी देखील उपलब्ध आहेत.यांच्या माध्यमातून तुम्ही साधा सोपा ऑनलाईन अर्ज आणि काही कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करून ताबडतोब पर्सनल लोन मिळू शकतात.

अगदी याच पद्धतीने जर तुम्हाला देखील ताबडतोब पैशांची गरज भागवण्याकरिता पर्सनल लोन हवे असेल तर तुम्ही बजाज फिन्सर्वच्या इन्स्टंट पर्सनल लोन ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही अगदी साध्या पद्धतीने अर्ज करून इन्स्टा पर्सनल लोन ऑफर च्या माध्यमातून दहा लाख रुपये तीस मिनिटांच्या आत मिळू शकतात. याकरिता नेमके काय करावे लागते? त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 बजाज फिन्सर्व इन्स्टा पर्सनल लोन ऑफरचा लाभ कसा घ्यावा?

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला बजाज फिन्सर्वच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल व त्या ठिकाणी गेल्यावर चेक इन्स्टा ऑफर वर क्लिक करा.

2- त्या ठिकाणी विचारलेली सर्व आवश्यक ती वैयक्तिक आणि आर्थिक तपशील भरणे गरजेचे आहे व आलेला ओटीपी नमूद करावा.

3- त्यानंतर ऑफर तपशील तपासून घ्यावा.

4- तुम्हाला ऑफर असेल तर अर्ज करावा आणि तुमच्या बँक खात्यात निधी मिळवा.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही प्रकरणांमध्ये चालू ग्राहकांना जशा विशेष ऑफर्स बजाज फिनसर्व कडून मिळतात व यांच्याकरिता कर्जाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होते व प्रक्रिया देखील विना अडथळा होत असते. परंतु ही ऑफर चेक केल्यानंतर जर तुम्ही इन्स्टा पर्सनल लोन ऑफर करिता पात्र नसाल तरी देखील तुम्ही बजाजच्या माध्यमातून पर्सनल लोन मिळवू शकतात.

याकरिता देखील तुम्हाला बजाज फिन्सर्वच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल व त्या ठिकाणी गेल्यानंतर अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करावे. त्यानंतर विचारलेली सगळी माहिती व्यवस्थित भरावी आणि तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम आणि हवा असलेला परतफेडीचा कालावधी निवडावा व नंतर अर्ज सबमिट करावा.

 बजाज फिन्सर्वकडून ताबडतोब पर्सनल लोन मिळवण्यासाठी पात्रता

बजाज फिन्सर्वकडून तुम्हाला सामान्य आणि इन्स्टा या दोन प्रकारच्या ऑफरसाठी पात्र होण्यामागे मुख्य फरक असून तो म्हणजे तुमचे बजाज सोबत नाते असणे गरजेचे आहे.

जर तुम्ही बजाज फिन्सर्व्हचे वर्तमान ग्राहक असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला इन्स्टा पर्सनल लोन ऑफरचा लाभ मिळतो. नाहीतर तुम्हाला बजाजचे सामान्य पर्सनल लोन मिळते. यासाठी काही पात्रता पूर्ण करणे देखील गरजेचे असते व ते पुढील प्रमाणे…

1- सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.

2- अर्जदाराचे वय किमान 21 आणि कमाल 67 वर्षाच्या आत असावे.

3- अर्जदार हा खाजगी किंवा सार्वजनिक कंपनीत किंवा एखाद्या एमएनसीमध्ये नोकरीला असणे गरजेचे आहे.

4- अर्जदाराच्या रहिवाशी शहरावर आधारित किमान मासिक पगाराचा निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचा सिबिल स्कोर साडेसातशे किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

 बजाज फिन्सर्व इन्स्टा पर्सनल लोनकरिता आवश्यक कागदपत्रे

बजाज फिन्सर्वच्या इन्स्टा ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी डॉक्युमेंट्स, कॅन्सल चेक म्हणजेच रद्द केलेला धनादेश आणि बँक खात्याचा तपशील देणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही सरकारने जारी केलेल्या पत्त्याचा पुरावा, कर्मचारी आयडी आणि तुमचा अलीकडील फोटो,

दोन महिन्याची पगाराची स्लिप आणि मागील तीन महिन्यांचे पगार खात्याचे बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. यामध्ये अर्ज करताना किंवा पडताळणी प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला काही जास्तीचे कागदपत्र देखील सादर करावे लागू शकतात. त्यामुळे तुमच्या कागदपत्र अद्ययावत असणे गरजेचे आहे.

Ajay Patil