अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-जर बजेट कमी असेल आणि आपण बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेकंड हँडचा पर्याय अधिक चांगला आहे. आपण केवळ नाममात्र रकमेत सेकंड-हँड बाइक खरेदी करू शकता.
वास्तविक, सेकंड हँड कार आणि बाईक विकणार्या डिजिटल प्लॅटफॉर्म DROOM वर असे अनेक डील आपल्या बजेटमध्ये असतील. DROOM च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार सेकंड हॅन्ड बजाज कॅलीबर केवळ 7 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल.
ही बाईक फर्स्ट ओनर विकत आहे. 110 सीसीची ही बाइक 60 हजार किलोमीटर धावली आहे. या बाईकचे मायलेज 67 kmpl आहे, इंजिन 111.6 सीसी, कमाल उर्जा 7.8 पीएस आणि व्हील साइज 18 इंच आहे.
या डील साठी आपल्याला ड्रूम च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे एक छोटी टोकन रक्कम द्यावी लागेल, जी रिफंडेबल असेल. याचा अर्थ असा की जर डील झाली नाही तर रक्कम परत मिळेल.
पेमेंटचा पर्याय म्हणून एनईएफटी / आरटीजीएस, चेक / डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड आदी उपलब्ध आहेत .बजाजची ही बाईक खूप लोकप्रिय आणि दमदार होती.
कंपनीने 1998 पासून 2006 पर्यंत या बाईकची निर्मिती केली. त्याच्या विभागातील सर्वात शक्तिशाली बाइक असल्याचे सिद्ध झाले. या बाईकमध्ये 111.6 सीसी इंजिन दिले गेले आहे ज्याने 7.8 पीएस पॉवर आणि 8.1 एनएम टॉर्क जनरेट केला आहे. या बाईकमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स होता.