Bank Holidays In June : आज पासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. खरे तर जून महिना हा पावसाळ्याचा पहिला महिना असतो. यामुळे या महिन्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. मान्सूनचा पहिलाच महिना असल्याने या महिन्यात खरीपातील पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ असते.
बी-बियाणे खरेदी करणे, खतांची खरेदी करणे, मशागत करणे अशा विविध कामांसाठी शेतकऱ्यांना भांडवल उभारणी करावी लागते. यामुळे कृषी व कृषीशी संबंधित व्यवसायांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळते.
मात्र या जून महिन्यात जर तुम्हाला बँकेशी निगडित काही कामे करायची असतील तर तुम्हाला तुमच्या कामांचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. कारण की जून महिन्यात तब्बल 11 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत.
या महिन्यात एवढे सण उत्सव नाहीयेत मात्र तरीही बँका 11 दिवस बंद राहणार आहे. आरबीआयने जून महिन्यांच्या सुट्ट्यांची यादी नुकतीच जाहीर केली असून आज आपण जून महिन्यात कोणकोणत्या तारखांना बँकांना कुलूप राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
पण, या सुट्ट्या सगळ्याच राज्यात लागू राहणार नाहीत. म्हणजे राज्यानुसार सुट्ट्यांची संख्या कमी जास्त होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
कोणत्या तारखांना कोणत्या राज्यात बंद राहणार बँका
1 June : आज लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. परिणामी, आज ज्या ठिकाणी मतदान होणार आहे तेथील बँका बंद राहणार आहेत.
2 June : रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
8 june : जून महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
9 June : रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.
15 June : या दिवशी राजा संक्रांति असल्याने मिझोराम आणि ओडिषा येथील बँका बंद राहतील..
16 June : रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
17 June : ईद-उल-अजहा निमित्ताने मिझोराम, सिक्कीम आणि इटानगर सोडून देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
18 June : ईद-उल-अजहा निमित्ताने जम्मू आणि काश्मीर मधील बँका बंद राहणार आहेत.
22 June : या दिवशी जून महिन्याचा चौथा शनिवार राहणार आहे यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.
23 June : रविवार निमित्ताने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.
30 June : रविवार असल्याने या दिवशी संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.